कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये १६ जुलै रोजी होणार असून, त्याआधीच सारे मिदनापूर शहर ममता बॅनर्जी यांचे कटआऊ ट्स, पोस्टर्स व होर्डिंग्जनी रंगवून टाकण्याचे तृणमूल काँग्रेसने ठरविले आहे.गेल्या काही काळापासून पश्चिम बंगालमध्ये पाय रोवण्याचे भाजपाचे प्रयत्न असून, त्याचा भाग म्हणूनच मोदी यांची सभा होणार आहे. मात्र सभेच्या ठिकाणी मोदी कोणत्याही रस्त्याने गेले की त्यांना त्यांच्या स्वागताच्या पोस्टर्स व बॅनर्सऐवजी ममता यांचीच होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स व कटआऊ ट्स दिसतील.मिदनापूर शहरात मोदी यांच्यापेक्षा ममता बॅनर्जी यांचाच अधिक प्रभाव असल्याचे दिसून यावे, यासाठी तृणमूलने ही खेळी खेळण्याचे ठरविले आहे. त्यासाठी हजारो पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज छपाईसाठी देण्यात आली आहेत. मोदी यांचे १६ जुलै रोजी कलाईकुंडा हवाई तळावर आगमन होईल. तेथून मिदनापूर २0 किलोमीटरवर आहे. तो रस्ता तसेच खडगपूर येथे मोदींच्या स्वागताचे व अभिनंदनाचे बॅनर्स व होर्डिंग्ज लावण्याचे भाजपाने ठरविले होते. पण त्याआधीच तृणमूल काँग्रेसने स्वत:ची योजना तयार केली. (वृत्तसंस्था)ममतांचा मेळावा २१ जुलैलाकोलकात्यामध्ये २१ जुलै रोजी तृणमूल काँग्रेसची रॅली होणार असून, त्यासाठी काही लाख लोक येतील, असे सांगण्यात येत आहे. त्या मेळाव्यातच ममता बॅनर्जी २0१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा बिगुल फुंकतील. त्याच्या तयारीसाठी १४ व १५ जुलै रोजी तृणमूल काँग्रेसतर्फे मिदनापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मेळावे घेण्यात येणार आहेत.
मोदी यांची सभा, छायाचित्रे मात्र ममता यांची
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 4:58 AM