हरीश गुप्तानवी दिल्ली : ४८ महिन्यांत ३८ योजना सुरू करणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान बनले आहेत. मे २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ३८ योजना सुरू करण्यात आल्याचे आता जाहीर झालेले आहे.काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी नुकताच टिष्ट्वटरवर असा दावा केला की, मोदी सरकारच्या २३ नव्या योजना/प्रकल्पांना केवळ नवी नावे दिली गेली आहेत. कारण या योजना/प्रकल्प संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) कार्यकाळातच सुरू केले गेले होते. थरूर यांचा हा दावा भाजपने धुडकावून लावताना या योजना/ प्रकल्प पूर्णपणे नवे असून त्यांची परिश्रमांनी अमलबजावणी केली आहे, असे म्हटले. परंतु, नेमक्या किती योजना आहेत याची कल्पना कोणालाही नाही. तथापि, हे गूढ संसदेत अहवाल मांडला गेल्यावर उकलले. त्यात ३८ योजना सुरू करण्यात आल्याचे म्हटले. नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राव इंदरजित सिंग यांनी भाजपचे खासदार सत्यनारायण जातिया यांना माहिती देताना सांगितले की, नीती आयोगाने फेब्रुवारी २०१५ मध्ये केलेल्या शिफारशींनुसार काही योजना या सुधारून घेण्यात आल्या आहेत.२०३० पर्यंत म्हणजे दीर्घकाळ नजरेसमोर ठेवून मोदी सरकारने या योजना राबवण्याचे ठरवले आहे. २०१७-२०१८ ते २०२३-२०१४ हा सात वर्षांचा कालावधी (पहिला टप्पा) राष्ट्रीय विकास कार्यक्रम साध्य करण्यासाठी असून २४ आॅगस्ट, २०१७ रोजी तीन वर्षांचा कृती कार्यक्रम सुरू केला गेला आहे व उर्वरीत कार्यक्रम पाच वर्षांत राबवला जाईल.स्वतंत्र संकेतस्थळाने २०१७ मध्ये असा दावा केला होता की मोदी सरकारने ज्या २३ योजना सुरू केल्या त्यातील १९ या जुन्या योजनांची नावे बदललेल्याच होत्या. त्यानंतर मोदी यांनी नव्या १५ योजना सुरू केल्या व त्यांची एकूण संख्या झाली ३८.या आहेत काही योजनाप्रधानमंत्री जनधन योजना, डिजिटल इंडिया, मेक इन इंडीया, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, हेल्थ कार्ड स्किम, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्वच्छ भारत मिशन, हृदय योजना, लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष्य, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्टँड अप इंडीया, स्टार्ट अप इंडीया, नई मंजिल स्किम, प्राइम मिनिस्टर रिसर्च फेलोशिप (पीएमआरएफ), प्रधानमंत्री किसान संपदा योजना, संसद आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
मोदींचा विक्रम, चार वर्षांत ३८ योजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 3:55 AM