शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

मॉडेलिंगसाठी नरेंद्र मोदी देणार पंतप्रधानपदाचा राजीनामा

By admin | Published: September 02, 2016 2:31 PM

मोदींचे परमस्नेही असलेल्या अमिताभ बच्चन यांनीच मोदींना राजकारणापेक्षा मॉडेलिंगमध्ये कसं निर्धोक करीअर आहे हे स्वानुभवाचे दाखले देत पटवून दिलंय.

योगेश मेहेंदळे, ऑलनाइन लोकमत
शुक्रवारचा दिवस उजाडलाच तो भारतातल्या अडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीसाठी सुखद धक्का देत... पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क रिलायन्स जिओचे मॉडेल म्हणून टाइम्स ऑफ इंडिया व हिंदुस्थान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकले. सोशल मीडियावर याचे कायच्या काय पडसाद उमटले. कुणी म्हटलं, की मोदी आणि अंबानींचं साटंलोटं आहेच, कुणी म्हटलं एम्ब्लेमस अँड नेम्स अॅक्ट 1950 या कायद्याचा हा भंग आहे, कुणी म्हटलं की रिलायन्सनं पंतप्रधानांना चतुरपणे वापरून घेतलं तर कुणी म्हटलं सरकारी जाहिरातीत फक्त पंतप्रधान असायला हवेत, या कोर्टाच्या आदेशाबरहुकूम रिलायन्सनं हे पाउल उचललं कारण रिलायन्स स्वत:मध्ये नी सरकारमध्ये भेदच करत नाही.
पण, खरं काय आहे ते आमच्या दिल्लीतल्या सूत्रांनी सांगितलंय आणि त्यानुसार वर नमूद केलेली एकही बाब खरी नाहीये... खरी गोष्ट ही आहे की लवकरच नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असून मॉडेलिंगमध्ये करीअर करणार आहेत. गुजरातच्या प्रमोशनसाठी कामाला आलेल्या व मोदींचे परमस्नेही असलेल्या अमिताभ बच्चन यांनीच मोदींना राजकारणापेक्षा मॉडेलिंगमध्ये कसं निर्धोक करीअर आहे हे स्वानुभवाचे दाखले देत पटवून दिलंय.
 
 
सूत्रांच्या सांगण्यानुसार पंतप्रधान होणं तेही बहुमतानं हा मोदींच्या राजकीय करीअरमधला परमोच्च बिंदू होता. यापुढे काही आता जाता येणं शक्य नाही. कारण, काही वर्षांनी इंग्लंडचे पंतप्रधान होऊ, मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ अशी काही सोय नाहीये तर भारतातच पुन्हा त्याच निवडणुका लढवाव्या लागतील. आणि तसं झालं तर, उलट, पुढच्या निवडणुकीत जागा घसरणार असल्याचेच अंदाज आहेत. ज्या गुजरातेतून मोदींनी दिल्लीत झेप घेतली, तो गुजरातही निसटत चाललाय. बिहार, पश्चिम बंगाल, केरळमध्ये सत्ता तर सोडाच लाजही राखता आली नाही. काश्मिरमध्ये अर्धवट सत्ता मिळाली, पण ती का मिळाली? असं वाटावं अशी काश्मिरची स्थिती आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींसारखा मुत्सद्दी माणूस भविष्याची तरतूद आत्तापासून करतील हेच त्यांचा इतिहास सांगतो. मोदी गुजरातचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी हिंदीतून भाषण करत आपलं खरं लक्ष्य दिल्ली असल्याचं दाखवून दिलं होतं. म्हणजे, मुख्यमंत्रीपदाची निवडणूक त्यांनी पंतप्रधानपदावर डोळा देत लढवली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि आमच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधानपदाचा अत्यंत रूबाबात राजीनामा देतील आणि भारतातलेच नव्हे तर जगातले सगळ्यात जास्त लोकप्रिय मॉडेल म्हणून नावलौकिक मिळवतील असा कयास आहे.
(ही वात्रटिका असून कृपया खरी बातमी समजू नये)