शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

मोदींच्या रशिया भेटीत होणार अणुसहकार्य करार

By admin | Published: December 20, 2015 11:14 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या युरेशियन देशांच्या दौऱ्यात अणुऊर्जा क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेने पाऊल टाकत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या युरेशियन देशांच्या दौऱ्यात अणुऊर्जा क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेने पाऊल टाकत भारत आणि रशिया यांच्यादरम्यान कुडानकुलमच्या पाचव्या आणि सहाव्या संयंत्राबाबतच्या एका करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.देशाची विजेची वाढती गरज भागविण्यासाठी सध्याच्या अणुविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी जास्तीत जास्त अणुभट्ट्या उभारण्याचा सरकारचा विचार आहे, असे सूत्रांनी सांगितले. मोदी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासोबत मॉस्को येथे वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बुधवारी रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यापूर्वी भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या समकक्ष असलेल्या रोसातोमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निकोलाय स्पास्की यांनी ७ व ८ डिसेंबर रोजी भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात स्पास्की यांनी मोदींच्या रशिया दौऱ्याच्या वेळी कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या संयंत्राबाबतच्या करारावर स्वाक्षरी होण्याच्या शक्यतेबाबत अणुऊर्जा विभागाचे सचिव शेखर बसू यांच्यासोबत चर्चा केली होती.(लोकमत न्यूज नेटवर्क)