नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जपान दौ:याच्या चौथ्या दिवशी इम्पिरियल पॅलेसमध्ये केलेल्या भाषणात, काँग्रेसकरिता केलेल्या धर्मनिरपेक्ष मित्र अशा उल्लेखावर त्या पक्षाने टीकास्र सोडले असून, त्यांचे ते वक्तव्य धक्कादायक व अनाठायी असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी टि¦टरवर केलेल्या नोंदीत, परदेशी भूमीवर धर्मनिरपेक्षतेची चेष्टा करणो हे धक्कादायक व पंतप्रधानांसाठी अशोभनीय आहे. त्यांच्या या वक्तव्याने भारताचा उपहास झाला आहे. वस्तुत: भारतात त्यांच्याच पक्षाने धार्मिकतेचे वातावरण तापवले आहे. मोदींनी जपानमध्ये धर्मनिरपेक्षतेसारख्या गंभीर मुद्याचे हंसे करणो हे अशिष्ट व अस्वीकार्य व अनपेक्षित आहे. त्यांनी भारताच्या धर्मनिरपेक्षतावाद्यांची जपानमध्ये खिल्ली उडविली आहे. आम्ही तेथे चेष्टेचा विषय ठरलो आहोत. आपल्या पाच दिवसांच्या जपान दौ:यात पंतप्रधान मोदींनी इम्पिरियल पॅलेसमध्ये सम्राट अकिहितो यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी, सम्राटांना भेटीदाखल गीतेची एक प्रत देण्याविषयी विधान केले. आपण गीतेची एक प्रत सोबत आणली असून, तसे करण्याने भारतात कदाचित वादंग माजेल असे म्हणून मोदींनी आमचे धर्मनिरपेक्ष मित्र त्यावर वादळ उभे करतील असे म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4 नवी दिल्ली : जपानच्या पाच दिवसांच्या दौ:यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी मायदेशी परतल़े परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचे स्वागत केल़े जपानचा दौरा पूर्णपणो यशस्वी राहिल्याबद्दल मोदींनी यावेळी समाधान व्यक्त केल़े
4 पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिला जपान दौरा होता़ मोदींच्या या दौ:यादरम्यान जपानने येत्या पाच वर्षात भारतातील विकास योजनांसाठी 35 अब्ज डॉलर्सचा निधी देण्याचे आश्वासन दिले आह़े यामुळे भारताच्या विकासाला मोठा हातभार लागणार आह़े
4 सोबतच 1998 च्या अणुचाचणीनंतर हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडसह सहा भारतीय संस्थांवरील प्रतिबंधही जपानने मागे घेतले आहेत़ सोबतच जपानसोबत भारताने पाच महत्त्वपूर्ण करारही केले आहेत़