शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

मोदींचा ‘टाईम मॅनेजमेंट’ फंडा

By admin | Published: April 10, 2016 3:48 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौऱ्यातील वेळेचे व्यवस्थापन बघून अधिकारीही चकित झाले आहेत. वेळेचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी पंतप्रधानांनी रात्री एखाद्या

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौऱ्यातील वेळेचे व्यवस्थापन बघून अधिकारीही चकित झाले आहेत. वेळेचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी पंतप्रधानांनी रात्री एखाद्या हॉटेलमध्ये विश्राम करण्याऐवजी विमानातच प्रवासात झोप घेतली आणि बहुतांश कार्यक्रम सकाळी ठेवले. त्यामुळे त्यांना अनेक लोकांच्या भेटीगाठी घेता आल्या. गेल्या ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत पंतप्रधान मोदी यांनी बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरबचा दौरा केला. या पाच दिवसांच्या प्रवासात त्यांनी तीन रात्री एअर इंडिया वनमध्येच घालवल्या आणि फक्त दोन रात्री विदेशी हॉटेलमध्ये आराम केला. दिल्ली ते बेल्जियम, ब्रसेल्स ते वॉशिंग्टन आणि तेथून रियादला जाण्याकरिता मोदींनी जाणीवपूर्वक रात्रीची वेळ निवडली होती.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान फक्त दोन दिवस हॉटेलमध्ये थांबले होते. एक दिवस वॉशिंग्टन आणि एक दिवस रियादला. केवळ ९७ तासांत त्यांनी अमेरिकेसह अनेक देशांचा दौरा केला असून, हे कुणालाही अविश्वसनीय वाटावे असेच आहे. पंतप्रधानांनी वेळेचा अशा पद्धतीने वापर केला नसता, तर हा दौरा ठराविक कालावधीत पूर्ण होणे शक्य नव्हते. त्यांनी विमानात झोपण्याचा निर्णय घेतला नसता, तर या दौऱ्याला किमान सहा दिवस लागले असते.माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा विदेश दौरा मात्र अपेक्षेपेक्षा अधिक दिवसांचा राहत होता आणि बहुतांश वेळेला तो एका शहरापुरताच मर्यादित असायचा, असेही या अधिकाऱ्याने नामोल्लेख न करण्याच्या अटीवर सांगितले. फार कमी लोक रात्रीचा प्रवास करतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)दोन वर्षांत ९५ दिवस विदेश दौराआपल्या पहिल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात मोदी ९५ दिवस विदेश दौऱ्यावर होते. या कालावधीत मनमोहनसिंग यांनी ७२ दिवस विदेशात घालवले.मोदी यांनी आतापर्यंत २० विदेश दौऱ्यांमध्ये ४० देशांना भेटी दिल्या. दुसरीकडे एवढ्याच कालावधीत संपुआ (एक)च्या कार्यकाळात मनमोहनसिंग यांनी १५ विदेश दौऱ्यांत १८ देशांना भेटी दिली होती. संपुआ (दोन)मध्ये पंतप्रधानपदी असताना त्यांनी दोन वर्षांत १७ विदेश दौऱ्यांमध्ये २४ देशांचा प्रवास केला.