अमेरिका म्हणते : ठोस सांगण्यासारखे अद्याप काहीही नाही
वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन दौ:यासाठी अजून तारीख निश्चित करण्यात आली नसल्याचे अमेरिकेने शनिवारी स्पष्ट केले. अमेरिकी परराष्ट्र मंत्रलयाच्या उपप्रवक्त्या मेरी हर्फ यांनी येथे आयोजित नियमित पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘पंतप्रधान मोदी यांच्या संभाव्य अमेरिका दौ:याबाबत सध्या माङयाकडे ठोस सांगण्यासारखे काहीही नाही. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे दोघेही पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. मात्र, या दौ:याची तारीख अजून निश्चित झाली नाही. माध्यमांमध्ये तारखेबाबत विविध बातम्या प्रसारित होत असल्याचे मला माहीत आहे; मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या सप्टेंबर महिनाअखेरीस चर्चेला येण्याचे ओबामा यांचे आमंत्रण स्वीकारले असून दौ:याच्या कालावधीस अंतिम रूप दिले जात आहे, अशी माहिती राजधानी नवी दिल्लीतील अधिकृत सूत्रंनी गेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीला दिली होती.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ओबामा यांनी अभिनंदन करण्यासाठी मोदी यांना फोन केला होता. तेव्हाच त्यांनी अमेरिका भेटीचेही निमंत्रण पंतप्रधान मोदी यांना दिले होते.
येत्या सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेची अमेरिकेत बैठक होत असून या अनुषंगाने दोन्ही नेत्यांची भेट होईल, असे मानले जात आहे. (वृत्तसंस्था)