फैजाबाद : अयोध्येमध्ये राममंदिराच्या बांधकामास सुरूवात व्हावी या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचे साधुसंतांनी ठरविले आहे. विश्व हिंदू परिषदेने सोमवारी येथे आयोजिलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या वेळी विहिंपेचे उपाध्यक्ष चम्पत राय उपस्थित होते. रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, राममंदिरासंदर्भात पंतप्रधानांशी आम्ही चर्चा करणार आहोत. मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राममंदिर बांधण्यासाठीच जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे अयोध्येतील कथित वादग्रस्त जागेवर भव्य राममंदिर उभारणे ही या दोघांची जबाबदारी आहे.