शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मोहन भागवतांनी देशाची माफी मागावी : राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:07 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर त्यांनी भारतीय लष्करावर अवमानकारक वक्तव्ये केल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर त्यांनी भारतीय लष्करावर अवमानकारक वक्तव्ये केल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जोरदार टीका केली. सीमेवर शत्रुंशी लढण्यासाठी भारतीय लष्कराच्या तयारीबद्दल शंका व्यक्त केल्याबद्दल भागवत यांनी क्षमा मागितली पाहिजे, असे गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.‘भागवत, तुम्ही हुतात्म्यांचा आणि आमच्या लष्कराचा अवमान केला आहे. तुमचा, धिक्कार असो’, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भागवत यांचे भाषण हे प्रत्येक भारतीयाचा अनादर करणारे आहे, कारण जे देशासाठी लढले त्यांचा ते अपमान करणारे आहे. आमच्या ध्वजाचा तो अपमान आहे. कारण, प्रत्येक जवानाने त्याला वंदन केलेले असते, असेही गांधी म्हणाले.विधानाचा विपर्यास : संघमोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि भारतीय लष्कराची तुलना केलेली नव्हती व याविषयावरील त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे संघाने सोमवारी म्हटले. सामान्य लोक आणि संघाचे कार्यकर्ते यांच्यात ती तुलना होती. भारतीय लष्कराशी ती दुरान्वयेही संबंधित नव्हती, असे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी निवेदनात म्हटले.भाजपचे सरचिटणीस राम माधव म्हणाले, भागवतांचे ते वक्तव्य संघटनेच्या तत्परतेशी संबंधित असू शकते. संघाला लष्कराच्या शौर्याबद्दल व त्यागाबद्दल आदरच आहे. भागवत यांनी संघ कार्यकर्त्यांपुढे केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला. भागवत नेमके काय म्हणाले हे मला माहीत नाही. संघ कार्यकर्त्यांच्या तयारीबद्दल ते म्हणाले असू शकतात. संघ कार्यकर्ते देशाच्या संरक्षणासाठी नेहमी लष्कराच्या बाजुने उभे असतात.काय म्हणाले होते भागवतदेशासाठी लढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास, अवघ्या तीन दिवसांत ‘लष्कर’ उभारण्याची क्षमता राष्ट्रीय स्वयंसवेक संघाची आहे, असे संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी येथे म्हटले. संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भागवत म्हणाले, लष्कराला जवान तयार करण्यास ६ ते ७ महिने लागतात. संघ ते काम ३० दिवसांत करील. ही आमची क्षमता आहे. देशासमोर संकट उभे ठाकले व घटनेने तशी परवानगी दिली, तर स्वयंसेवक सीमेवर जायला तयार आहेत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी