- शीलेश शर्मानवी दिल्ली : महाराष्ट्राचे प्रभारी महासचिव मोहन प्रकाश, हिमाचलचे प्रभारी महासचिव सुशीलकुमार शिंदे व महासचिव मुकुल वासनिक यांना दूर केले जाण्याची चर्चा आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नव्या तरुण नेत्यांची यादी तयार केली आहे. त्यांना संघटनेत महत्त्वाची पदे देण्यात येणार आहेत.महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्या तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. कर्नाटकचे प्रभारी महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह ठाकूर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. छत्तीसगडमध्ये कमलेश्वर पटेल यांच्या जागी चंदन यादव यांना सचिव म्हणून नेमले आहे.महाराष्ट्रातील जे नेते संघटनेत मोठ्या पदांवर आहेत त्यांना हटवून नव्या नेत्यांवर जबाबदारी देणे सुरु केले आहे. त्यानुसार, अविनाश पांडे आणि राजीव सातव यांना महासचिव बनविण्याचे संकेत आहेत. मोहनप्रकाश, सुशीलकुमार शिंदे व मुकुल वासनिक यांना हटविणे निश्चित मानले जात आहे. आगामी एक दोन दिवसांत याची औपचारिक घोषणा होऊ शकते.राहुल गांधी यांची भाजपावर टीकाबिहार व पश्चिम बंगालमधील जातीय हिंसाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर थेट हल्ला केला आहे. ज्यांनी आपला मुलगाद्वेष व जातीय हिंसाचारात गमावला त्या यशपाल सक्सेना व इमाम रशीदी यांचे संदेश हेच स्पष्ट करतात की, या देशात नेहमीच द्वेषाचा पराभव प्रेमाचा विजय होतो. काँग्रेसचा पाया करुणा व स्नेह हाच आहे. भाजपा व संघाच्या विचारांना आम्ही जिंकू देणार नाही.
मोहन प्रकाश, शिंदेंना हटविणार? वासनिक यांनाही केले जाऊ शकते दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 5:43 AM