आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 12:54 PM2024-10-01T12:54:51+5:302024-10-01T13:01:45+5:30

आमदार मधू वर्मा अचानक बेशुद्ध पडले. यावेळी त्यांचे पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर अरुण सिंह भदौरिया यांनी सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचवला आहे.

mohan yadav awarded rau mla madhu verma pso for giving cpr during heart attack | आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?

आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशच्या राऊ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मधू वर्मा अचानक बेशुद्ध पडले. यावेळी त्यांचे पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर अरुण सिंह भदौरिया यांनी सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचवला आहे. मधू वर्मा यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहनलाल यादव आमदार मधू वर्मा यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. येथे त्यांनी आमदारांची प्रकृती जाणून घेतली. 

इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना मधू वर्मा यांचे पीएसओ अरुण सिंह भदौरिया यांची माहिती दिली. यानंतर, मुख्यमंत्र्यांनी वर्मा यांचे पीएसओ यांची भेट घेतली. ५० हजार रुपयांचं बक्षिस आणि प्रमोशन देण्याबाबत सांगितलं आहे. २४ सप्टेंबर मधू वर्मा हे स्थानिक लोकांच्या समस्या ऐकत होते. याच दरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले. 

पीएसओ अरुण सिंह भदोरिया त्यांना सतत सीपीआर देत होते. त्यानंतर आमदार वर्मा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आमदाराच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या आमदाराची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव त्यांना रुग्णालयात भेटायला गेले. येथे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आमदार वर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना सीपीआरची माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमदार मधू वर्मा यांचे पीएसओ अरुण सिंह भदौरिया यांचीही भेट घेतली. पीएसओला ५० हजार रुपयांचे बक्षिस देण्याबरोबरच प्रमोशन देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 
 

Web Title: mohan yadav awarded rau mla madhu verma pso for giving cpr during heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.