अभिलाष खांडेकर
भोपाळ : मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कुठेच नसलेल्या डॉ. मोहन यादव यांची सोमवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. यादव हे आरएसएसचे स्वयंसेवक आहेत.
ओबीसींचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. यादव हे शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात उच्च शिक्षणमंत्री होते. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मावळते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
देवरा अन् शुक्ला दाेन उपमुख्यमंत्री
जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला हे दोन उपमुख्यमंत्री असतील, तर नरेंद्रसिंह तोमर यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले.
राजस्थानचा निर्णय आज?
भाजप आमदारांची मंगळवारी बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा हाेऊ शकते.