शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत गोंधळ, आयोजकांशी वाद; जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 11:31 PM

पोलीस कर्मचारी जखमी, स्वत:च्या बचावासाठी करावा लागला सौम्य लाठीचार्ज

Moharram Procession In Delhi: दिल्लीतील नांगलोई परिसरात मोहरमच्या मिरवणुकीत मोठा गोंधळ उडाला आहे. या मिरवणुकीत सुमारे 8 ते 10 हजार लोक सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या आयोजकांना मिरवणुकीचा मार्ग अगोदरच सांगण्यात आला होता, मात्र मध्येच 1-2 आयोजकांनी मार्ग बदलण्यास सुरुवात केली. यावर पोलीस समजावून सांगण्यासाठी पुढे आले, मात्र तोपर्यंत जमावाने पोलिसांवरदगडफेक सुरू केली. मिरवणुकीत सुरू झालेल्या हिंसाचाराने भयंकर रूप धारण केले. त्यानंतर बचावासाठी व जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यादरम्यान अनेक पोलीस कर्मचारी जखमीही झाले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

डीसीपी हरेंद्र के सिंह यांनी सांगितले की, नांगलोई भागात ताजिया मिरवणूक निघाली होती ज्यात सुमारे 8-10 हजार लोक सामील होते. आयोजक शांततेने पुढे जात होते, त्यामुळे 1-2 आयोजक थोडे संतापले, त्यांनी आमच्या बैठकीत ठरलेला मार्ग बदलण्यास सुरुवात केली आणि पोलिस त्यांना रोखण्यासाठी पुढे आले तेव्हा त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. बेशिस्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यानंतर जमाव वेगळे करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यात अनेक पोलिसही जखमी झाले आहेत. दगडफेकीमुळे अनेक पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे, मात्र आता सर्व काही आटोक्यात आले आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर जखमी झालेल्या 8-10 पोलिसांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ताजिया काढताना अशा घटना अनेक ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत. वाराणसीमध्ये ताजिया मिरवणुकीत शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये दगडफेक सुरू झाली होती. पोलिसांनी मध्येच येऊन प्रकरणावर नियंत्रण मिळवले.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसstone peltingदगडफेक