मोदींच्या स्तुतीवरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद, मोईलींनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:03 PM2019-08-28T22:03:19+5:302019-08-28T22:04:42+5:30
काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्तुतीवरून आता काँग्रेस पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
बंगळुरू - काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्तुतीवरून आता काँग्रेस पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी नरेंद्र मोदीची स्तुती करणारी विधाने करणाऱ्या जयराम रमेश आणि शशी थरूर यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत टीका करणे योग्य नाही असे सांगत जयराम रमेश यांच्यासह अभिषेक मनु सिंघवी आणि शशी थरूर या काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात मोदींच्या काही निर्णयाचे कौतुक केले होते.
वीरप्पा मोईली म्हणाले की,''जयराम रमेश यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान आलेल्या धोरणलकव्यासाठी जयराम रमेश हेच जबाबदार होते, असा आरोप मोईली यांनी केला. तसेच शशी थरुर यांच्या वक्तव्याबाबतही मोईली यांनी नाराजी व्यक्त केली. शशी थरूर यांच्याकडे कधीही परिपक्व राजकारणी म्हणून पाहिले गेले नाही. ते नेहमीच अशी विधाने करून माध्यमांमध्ये स्थान मिळवत असतात, असे मोईली म्हणाले.
Veerappa Moily, Congress: Any leader including Jairam Ramesh shouldn't make any such statement which will demoralize the rank & file of Congress party especially when Rahul Gandhi Ji is fighting for the cause of the party and also against policies of the present govt. pic.twitter.com/YnVFWJmxwW
— ANI (@ANI) August 28, 2019
रमेश आणि थरूर यांची विधाने अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगत मोईली यांनी काँग्रेस नेतृत्वाने या दोन्ही नेत्यांवर कारवाई शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस मोईली यांनी केली.
मोदींना नेहमीच खलनायक ठरवणे चुकीचे ठरेल, असे रमेश म्हणाले होते. त्याबाबत मोईलींना विचारले असता त्यांनी रमेश यांचे वक्तव्य अत्यंत वाईट असल्याचे सांगत अशी विधाने करून ते भाजपाची जुळवून घेण्याचे काम करत आहेत, टोला लगावला. जर कुणी अशा प्रकारची वक्तव्ये करत असेल तर ती व्यक्ती काँग्रेस आणि त्याच्या नेतृत्वासाठी काम करत नाही, असे मी मानतो, असेही मोईली म्हणाले.