तरुणीचा विनयभंग; आरोपीस दोन वर्षाच्या कारावास आरोपी बुलडाणा जिल्ातील
By admin | Published: January 14, 2017 12:06 AM
चाकण : तरुणीला मोबाईल वरून अश्लील संदेश व संभाषण पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी चाकण येथील एका कंपनीतील सिक्युरिटी गार्डला भादंवि कलम ३५४ अन्वये दोन वषार्ची कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी अतुल गणेश पाटील ( २७) बुलडाणा जिल्ातील मातोळा येथील रहीवासी आहे.
चाकण : तरुणीला मोबाईल वरून अश्लील संदेश व संभाषण पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी चाकण येथील एका कंपनीतील सिक्युरिटी गार्डला भादंवि कलम ३५४ अन्वये दोन वषार्ची कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी अतुल गणेश पाटील ( २७) बुलडाणा जिल्ातील मातोळा येथील रहीवासी आहे. , रा. मातोळा, ता. मातोळा, जि. बुलढाणा, सध्या रा. नाणेकरवाडी, चाकण ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्यात चाकण पोस्टे गु.र.नं १७/१७, आर सी सी नंबर ३१ /२०१७, कलम ३५४(ड) भा. द. वि अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपी पाटील हा चाकण एम आय डी सी तील निघोजे गावच्या हद्दीतील मॅग्नेटिक मदरसन या कंपनीत सिक्युरिटी गार्डचे काम करीत होता. दिनांक २८ डिसेंबर २०१६ रोजी आरोपीने याच कंपनीतील पीडित महिलेस अश्लील संदेश व संभाषण पाठवून विनयभंग केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे सदर गुन्ाचा तपास २४ तासात पूर्ण करून आरोपी विरुद्ध में. कोर्टात दाखल केलेले होता. व त्यानुसार सदर चे प्रकरणात सर्व साक्षीदारचे जाबजबाब नोंदवून आरोपीस कोर्टासमोर हजर केल्यानंतर ४८ तासात शिक्षा देण्यात आलेली हा महाराष्र्ट्तील सर्वात जलद दिलेला प्रथम न्यायनिवाडा आहे. सदर प्रकरणात एकूण ५ साक्षिदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात सहायक सरकारी वकील राजीव एम. तडवी यांनी कामकाज पाहिले. सदर गुन्ाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश मुंडे यांनी केला आहे. सदर प्रकरणात चाकण पोलीस ठाण्यातील कोर्ट पोलीस हवालदार संजय मोघे बक्कल नं ६५६ यांनी कामकाज पाहिले.