आगरताळा - पंतप्रधान नरेंद्र मोदींची शनिवारी त्रिपुरा येथे जाहीर सभा झाला. त्यावेळी समारंभाचे फलकाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. तर, यावेळी मोदींनी भाषणही केलं. या व्यासपीठावर भाजपाच्या मंत्र्याने एका महिला मंत्र्याचा विनयभंग केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन भाजपाच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर भाजपाने हा चरित्रहनन करण्याचा प्रकार असल्याचं म्हटले आहे.
त्रिपुरातील राज्यमंत्री मनोज कांती देव यांनी जाहीरपणे त्यांच्याच मंत्रिडळातील एका महिलेचा विनयभंग केला आहे. याबाबत, महिला मंत्र्याने अद्याप कुठलिही तक्रार दिली नसली तर सोशल मीडियावर मंत्रीमहोदयांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन विरोधकांनी मोनोज कांती देव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्रिपुरातील विरोधी पक्षाचे संजोयक यांनी मोनोज देव यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
त्रिपुरातील कार्यक्रमावेळी ज्या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, त्याच मंचावर मुख्यमंत्री विप्लबकुमार देव आणि इतरही मंत्री हजर होते. त्यावेळी मंचावर उपस्थित महिला मंत्र्याचा विनयभंग करण्यात आला आहे. समाजकल्याण आणि शिक्षणमंत्री संतना चकमा यांच्याशी हे गैरवर्तन करण्यात आले आहे. मोनोज देव यांच्या या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत. तर, सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलच चर्चिलं जात आहे. याबाबत एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीनेही बातमी दिली आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री संतना चकमा या आदिवासी महिलांचे प्रतिनिधित्व करतात.