बंगळूरू : व्हॉटसअॅपवरून पैसे पाठविण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) व्हॉटसअॅपला युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वापराची परवानगी दिली आहे. पेटीएम आणि मोबीक्विक प्रमाणेच व्हॉटसअॅपवरूनही ग्राहक आर्थिक देवाण-घेवाण करू शकतील. आर्थिक व्यवहारांसाठी आता कंपनी भारतातील सरकारी आणि खासगी बँकांशी चर्चा करत आहे. गुगलही यासाठी प्रयत्नात आहे.एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ए. पी. होटा यांनी व्हॉटसअॅपला यूपीआय वापराची परवानगी दिली असल्याची माहिती दिली.
व्हॉटसअॅपद्वारे लवकरच पैसेही पाठवता येणार
By admin | Published: July 13, 2017 12:00 AM