विम्याच्या पैशांसाठी भाजपा नेत्याने नोकराला मारून रचला स्वत:च्या हत्येचा बनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:50 PM2019-01-29T16:50:09+5:302019-01-29T17:02:50+5:30

मध्य प्रदेशमधील रतलाम येथील कमेड गावात गेल्या आठवड्यात झालेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. आता मात्र या घटनेविषयीची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

For the money of the insurance, the BJP leader killed a servant and made his own murder drama | विम्याच्या पैशांसाठी भाजपा नेत्याने नोकराला मारून रचला स्वत:च्या हत्येचा बनाव

विम्याच्या पैशांसाठी भाजपा नेत्याने नोकराला मारून रचला स्वत:च्या हत्येचा बनाव

Next
ठळक मुद्देमध्य प्रदेशमधील रतलाम येथील कमेड गावात गेल्या आठवड्यात झालेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. आता मात्र या घटनेविषयीची खळबळजनक माहिती समोर आली आहे.विम्याचे पैसे आणि इतर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आणि उधारी चुकवण्यासाठी भाजपा नेता हिंमत पाटिदार याने स्वत:च आपल्या जुन्या नोकराची हत्या करून स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला होताहिंमत पाटिदार सध्या फरार आहे. तसेच त्याच्याबाबत माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे

रतलाम (मध्य प्रदेश) -  मध्य प्रदेशमधील रतलाम येथील कमेड गावात गेल्या आठवड्यात झालेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. आता मात्र या घटनेविषयीची खळबळजनक माहिती समोर आली आहे. विम्याचे पैसे आणि इतर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आणि उधारी चुकवण्यासाठी भाजपा नेता हिंमत पाटिदार याने स्वत:च आपल्या जुन्या नोकराची हत्या करून स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. 

यासंदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी, 23 जानेवारी रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास कमेड गावात भाजपा कार्यकर्ता हिंमत पाटिदार याची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची तसेच मृताची ओळख दडवण्यासाठी चेहरा विद्रूप केल्याची माहिती देणारा फोन पोलिसांना आला. या प्रकरणाची माहिती सर्वप्रथम हिमत याचे वडील लक्ष्मीनारायण पाटीदार यांनी आपला मुलगा सुरेश याला दिली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. 

घटनास्थळावरून हिंमत याच्याशी संबंधित असलेल्या अनेक वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या. प्राथमिक तपासात हा मृतदेह हिंमतचाच असावा, असे वाटत होते. मात्र त्याचदरम्यान गावातीलच मदन मालवीय हा बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संबंधित वस्तू शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर काही कपडे आणि चप्पल मिळाले. मदन याच्या वडिलांने या वस्तूंची ओळख पटवली. 

या प्रकारानंतर पोलिसांना हिंमत याच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला. अधिक तपास केला असता सापडलेला मृतदेह हा हिंमतचा नव्हे तर मदन याचाच असल्याचे आणि हिंमत याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याची हत्या केल्याचे उघड झाले.

याबाबत रतलामचे एसपी गौरव तिवारी यांनी सांगितले की, ''मृत मदन हा काही काळापूर्वी  हिंमत पाटिदार याच्या शेतात मजुरी करत असे. दरम्यान, हिंमत याने 17 डिसेंबर रोजी स्वत:चा 20 लाख रुपयांचा विमा उतरवला होता. तसेच त्याच्यावर दहा लाखांची उधारीही होती. या उधारीपासून वाचण्यासाठीच त्याने हे कारस्थान रचले. त्याने आपल्या शेतात काम करणाऱ्या मदन मालवीय याची हत्या केली. त्यानंतर त्याची ओळख लपवण्यासाठी त्याचा चेहरा जाळला आणि स्वत:चा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. दरम्यान, हिंमत पाटिदार सध्या फरार आहे. तसेच त्याच्याबाबत माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे.  

Web Title: For the money of the insurance, the BJP leader killed a servant and made his own murder drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.