ईडीने कारवाई करत रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकचे अध्यक्ष आरके अरोरा यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मंगळवारी तिसर्या फेरीच्या चौकशीनंतर अरोरा यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आले. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये दाखल करण्यात आलेल्या अनेक एफआयआरमध्ये सुपरटेक समूह, त्याचे संचालक आणि प्रवर्तक यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरण समोर आले.
राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक, एस जयशंकर यांच्यासह 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण
ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरोरा यांच्या कुटुंबीयांना अटकेची माहिती दिली. अरोरा यांना बुधवारी दिल्लीतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे, ईडी त्यांची पुढील रिमांड मागणार आहे. या वर्षी एप्रिलमध्ये दिलेल्या निवेदनात, ईडीने म्हटले होते की कंपनी आणि तिचे संचालक त्यांच्या रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये बुक केलेल्या फ्लॅटसाठी संभाव्य खरेदीदारांकडून आगाऊ पैसे गोळा करून लोकांची फसवणूक करण्याच्या "गुन्हेगारी कटात" सामील होते. अरोरा हे बिल्डर्स बॉडी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष देखील आहेत.
सुपरटेक ग्रुप ऑफ कंपनीजने खरेदीदारांकडून पैसे घेतले आणि फ्लॅट्स बांधण्यासाठी बँकांकडून कर्जही घेतले, पण हा निधी जमीन खरेदीसाठी वळवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर बँकांकडे कर्ज फेडण्यासाठी जमीन गहाण ठेवली. ईडीने आपल्या तपासात म्हटले आहे की सुपरटेक ग्रुपने बँका आणि वित्तीय संस्थांना पेमेंट करण्यातही चूक केली आहे. त्यामुळे दीड हजार कोटींचे कर्ज एनपीए झाले.
एफआयआरमध्येही सुपरटेक आणि त्यांच्या संचालकांवर घर खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ते सदनिका खरेदीदारांना देण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये, ईडीने रिअल इस्टेट समूह आणि त्याच्या संचालकांची ४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. गेल्या वर्षी, न्यायालयाच्या आदेशानंतर नोएडामधील सुपरटेकचे बेकायदेशीर ट्विन टॉवर ३,००० किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करून पाडण्यात आले होते.