नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वीरभद्र यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.सप्टेंबरमध्ये सीबीआयने दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीची दखल घेत, अंमलबजावणी संचालनालयाने हा गुन्हा दाखल केला. मनी लॉड्रिंग अॅक्टअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ‘महत्त्वपूर्ण’ दस्तऐवज तपासकर्त्यांच्या हाती लागले आहेत. त्याद्वारे वीरभद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कथितरीत्या अवैध धनाचा वापर करून केलेल्या गुन्ह्याबाबतचे काही धागेदोरे तपासकर्त्यांना सापडले आहेत.
वीरभद्र यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगचा गुन्हा
By admin | Published: November 16, 2015 12:11 AM