ऑनलाइन लोकमत
लिस्बन, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौ-यावर असून शनिवारी पोर्तुगालमध्ये पोहोचले. लिस्बन विमानतळावर पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. यानंतर पंतप्रधान मोदी नेसेसिदाजी पॅलेसमध्ये पोहोचले, तिथे पुन्हा अँटोनियो कोस्टा यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. पॅलेसमध्ये दोघांनीही सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाकडे विशेष लक्ष देण्यात आलं होतं. त्यांच्यासाठी खास गुजराती पदार्थ तयार करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगालनंतर अमेरिका आणि नेदरलँड्सचा दौरा करणार आहेत. अँटोनियो कोस्टा यांनी यावर्षी जानेवारीत भारत दौरा केला होता. त्यानंतर मोदी पोर्तुगाल दौ-यावर पोहोचले आहेत. अँटोनियो कोस्टा भारतीय वंशाचे असून गोव्याचे आहेत.
#WATCH: Prime Minister Narendra Modi and Portuguese Prime Minister Antonio Costa interact at Necessidades Palace in Portugal"s Lisbon. pic.twitter.com/TpUfk7iDFJ— ANI (@ANI_news) June 24, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाची विशेष सोय करण्यात आली होती. मोदी गुजरातचे असल्याने त्यांच्या आवडीचे गुजराती पदार्थ तयार करण्यात आले होते. यामध्ये कोफ्ता, राजमा, तडका दाल, केसर राईस, पराठा, रोटी, पापड, मँगो श्रीखंड, गुलाब जामून सहित इतर पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती.
Portuguese Prime Minister Antonio Costa arranged a special Gujarati meal at the lunch hosted for PM Narendra Modi in Portugal. pic.twitter.com/Zh8a7plNbW— ANI (@ANI_news) June 24, 2017
पोर्तुगाल दौ-यासाठी रवाना होण्याआधी मोदींनी सांगितलं होतं की, ""मी 24 जून 2017 रोजी अधिकृतपणे पोर्तुगाल दौ-यावर असेल"". अँटोनियो कोस्टा यांच्या भारत दौ-यानंतर दोन्ही देशांमधील मैत्रीपुर्ण संबंधांना गती मिळाली आहे.