गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका पाच वर्षे वयाच्या मुलीला मंकीपॉक्सची लक्षणे आढळली आहेत. तिच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (एनआयव्ही) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल लवकरच हाती येण्याची शक्यता आहे. या मुलीच्या शरीराला खाज येत असून, लाल चट्टे उठले आहेत.
दक्षतेचा उपाय म्हणून या मुलीची वैद्यकीय तपासणी व रक्तचाचणी करण्यात आली. खाज व चट्टे या तक्रारी वगळता तिला अन्य कसलाही त्रास होत नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. महिनाभरात विदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात ही मुलगी आलेली नाही. तिला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लोकांनी घाबरू नये, असे डाॅक्टर म्हणाले. आतापयर्यंत ३० हून अधिक देशांत मंकीपाॅक्स पसरला आहे. (वृत्तसंस्था)
देशात एकही रुग्ण नाहीदेशात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही, असे केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर्वतयारी करावी, असे सांगत केंद्र सरकारने त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे मंगळवारी जारी केली होती.