शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला, मुलांसाठी ठरू शकतो घातक, 'या' ठिकाणी हाय अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 7:17 PM

monkeypox : केरळमधील पाच जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, कारण या पाच जिल्ह्यांतील लोक संक्रमित रुग्णासोबत प्रवास करत होते.

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात मंकीपॉक्स व्हायरसची 7000 हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. हा व्हायरस 75 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. याला महामारी म्हणून घोषित करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. केरळमध्ये मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळल्यानंतर भारतात या व्हायरसबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केरळमधील पाच जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, कारण या पाच जिल्ह्यांतील लोक संक्रमित रुग्णासोबत प्रवास करत होते.

विशेषत: मुलांना या व्हायसरपासून स्वतःचे संरक्षण करण्यास सांगितले आहे. असे का होते हे जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. दरम्यान, 1975 पर्यंत भारतात स्मॉल पॉक्स आणि चिकन पॉक्स आजार आढळून आले होते, पण त्यानंतर हळूहळू भारताने लसीकरण कार्यक्रमाद्वारे या आजारावर नियंत्रण मिळवले. 1975 च्या आसपास जन्मलेल्या बहुतेक लोकांना एकतर लसीकरण करण्यात आले होते किंवा ते एकदा या आजारापासून बरे झाले होते.

आयसीएमआरने नुकत्याच जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुलांना मंकीपॉक्सपासून अधिक काळजी घ्यावी लागेल. कारण त्यांना चेचक विरुद्ध लसीकरण केलेले नाही. मुलांना चेचक रोगाचा त्रास झाला नाही किंवा त्यांना लसीची गरज नव्हती. एम्सच्या मेडिसिन विभागाचे तज्ज्ञ डॉ. पीयूष रंजन यांच्या म्हणण्यानुसार, तरुण आणि मुलांना या आजारापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण त्यांच्यात लसीची प्रतिकारशक्ती किंवा रोगापासून बरे होण्याची प्रतिकारशक्ती नाही.

आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वेही जारीआरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. यानुसार लोकांनी फ्लूची लक्षणे आणि ताप असलेल्या रुग्णांच्या संपर्कात येणे टाळावे. मृत आणि इतर वन्य प्राण्यांपासूनही लांब राहावे, असे म्हटले आहे. देशात मंकीपॉक्सचा धोका वाढू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषत: मुलांनी यापेक्षा अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मधुकर रेनबो हॉस्पिटलच्या डॉ. अनामिका यांच्या मते, लहान मुलांना झुनोटिक  (zoonotic) आजार होण्याची शक्यता जास्त असते.

मंकीपॉक्स हा देखील एक झुनोटिक रोग आहे, जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो आणि नंतर त्याचे संक्रमण मानवांमध्ये सुरू होते. मंकीपॉक्सचा व्हायरस लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, कारण मुलांना स्मॉल पॉक्सची लस दिली गेली नाही. मुलांना स्वच्छतेची काळजीही घेता येत नाही, त्यांना मंकीपॉक्सची लागण झाली असेल तर हा व्हायरस त्यांच्यात अनेक दिवस राहू शकतो. त्यामुळे जास्त ताप आणि लाल पुरळ अंगावर येऊ शकतात.

टॅग्स :Healthआरोग्य