मंकीपॉक्सची 2 प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क; परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 09:13 PM2022-07-18T21:13:11+5:302022-07-18T21:26:15+5:30

Monkeypox news case in India : मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केल्या असून आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाणार आहे.

monkeypox two cases reported in india centre direct screening of foreign passengers | मंकीपॉक्सची 2 प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क; परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची होणार तपासणी

मंकीपॉक्सची 2 प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क; परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची होणार तपासणी

googlenewsNext

नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असतानाच आता केरळमध्ये आढळलेल्या मंकीपॉक्समुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सोमवारी केरळमधील कुन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. यापूर्वी केरळमध्येच गेल्या आठवड्यात देशातील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. दरम्यान, मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केल्या असून आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची बंदरांवर तपासणी केली जाईल.

आरोग्य मंत्रालयाने विमानतळ आरोग्य कर्मचार्‍यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत आरोग्य अधिकाऱ्यांना मंकीपॉक्स ओळखण्यासाठी आणि उपचारांसाठी मार्गदर्शक तत्त्वांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, विमानतळ-बंदरे आणि इतर चेकपॉईंट्स आहेत, जेथून लोक परदेशातून भारतात येतात. त्यांच्यात समन्वय असावा, हे देखील सुनिश्चित करण्यात आले.

भारतात मंकीपॉक्सची दोन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. पहिले प्रकरण 35 वर्षीय तरुणाचे होते, हे प्रकरण 13 जुलै रोजी समोर आले होते, तर दुसरे प्रकरण 31 वर्षीय तरुणाचे आहे जे आज समोर आले आहे. या तरुणाला उपचारासाठी कुन्नूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही घटना केरळमधील असून दोन्ही तरुण आखाती देशातून आले होते.

केरळमध्ये आलेला दुसरा मंकीपॉक्सचा रुग्ण दुबईहून कर्नाटकच्या मंगळुरू विमानतळावर उतरला होता. आजाराची लक्षणे दिसू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. याआधी गुरुवारी, कोल्लम जिल्ह्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य उपाययोजना सुरू करण्यात राज्य आरोग्य अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी गेल्या आठवड्यात केरळला एक उच्चस्तरीय पथक पाठवले होते.

केंद्रीय पथकाची केरळला भेट!
गेल्या आठवड्यात आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, केरळच्या कोल्लम जिल्ह्यातून मंकीपॉक्सची पुष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने याची तपासण्यासाठी एक केंद्रीय पथक पाठवण्याचा आणि केरळ राज्य सरकारला आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना सुरू करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की,  ही टीम राज्याच्या आरोग्य विभागांशी जवळून काम करेल आणि परिस्थितीचा आढावा घेईल. भारत सरकार परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून आणि संभाव्य उद्रेक झाल्यास राज्यांशी समन्वय साधून सक्रिय उपाययोजना करत आहे.

Web Title: monkeypox two cases reported in india centre direct screening of foreign passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.