नवी दिल्ली : ज्याची सर्वांना गेले काही दिवस प्रतीक्षा होती, तो मान्सून तीन दिवस आधीच म्हणजे मंगळवारी सकाळी केरळमध्ये दाखल झाला आणि लगेचच संपूर्ण राज्यात स्थिरावला आहे. त्यामुळे त्याचे ६ जून रोजी मुंबईत आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.केरळच्या बहुसंख्य भागात, तसेच तामिळनाडू व कर्नाटकच्या किनारी भागात आज पावसाने हजेरी लावली. गोव्यातही सकाळी ढगाळ वातावरण होते. मान्सूनची घोडदौड अशीच सुरू राहिली, तर पुढील आठवडाभरात तो कोकणासह मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.स्कायमेट या संस्थेने २८ मे रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. हवामान विभागाने मात्र, २९ मे रोजी मान्सून येणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. हे अंदाज सध्या केरळपुरते तरी जवळपास खरे ठरले आहेत.कोकण, गोव्यात पावसाची शक्यताबुधवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ गोव्याच्या किनारपट्टीवर व दक्षिण महाराष्ट्रात ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़ मच्छीमारांनी दक्षिण कोकण व गोव्याच्या समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़विदर्भ तापलेलाचमहाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात उन्हाचा तडाखा कमी झाला असला, तरी विदर्भ अद्याप तापलेला आहे. अकोला येथे ४४, अमरावतीत ४५़६, बुलडाणा ४०़५, चंद्रपूर ४७़८, गोंदिया ४४़७, नागपूर ४६़७, वर्धा ४७, यवतमाळमध्ये ४४़५ तापमान होते.अंदाज कधी बरोबर, कधी ‘अंदाज’च!!भारतीय हवामान विभागाचे अंदाज गेल्या तीन वर्षांपासून अचूक ठरत आहेत. या विभागाने २०१५ साली ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असे जाहीर केले होते, पण त्या वर्षी मान्सूनचे आगमन सहा दिवस विलंबाने म्हणजे ५ जूनला झाले होते.गेल्या वर्षी दोन दिवस आधी म्हणजे ३0 मे रोजी मान्सूनने केरळात हजेरी लावली होती. मागील वर्षी ३० मे रोजी केरळात मान्सून दाखल झाला होता. आतापर्यंत २0१५ चा अपवाद वगळता मान्सूनच्या आगमनात १ वा २ दिवसांचा फरक होत असतो.वेगाने वाटचालतो केरळात १ जून रोजी दाखल होतो. अंदमानमध्ये दाखल होण्याची त्याची तारीख २० मे आहे.परंतु अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने अंदमानच्या दक्षिण समुद्रात मान्सूनचे आगमन यंदाउशिरा झाले होते़.चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर मात्र त्याने वेगाने वाटचाल केली.महाराष्ट्रात वेळेवर येणारकेरळमध्ये मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मान्सून कर्नाटकात येत्या दोन दिवसांत दाखल होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात वेळेवर येण्याची शक्यता आहे.- डॉ. ए. के. श्रीवास्तव, भारतीय हवामान विभाग
मान्सून आला ! ; राज्यातही वेळेत दाखल होणार, मुंबई-कोकणात ६ जूनला येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 5:56 AM