नवी दिल्ली : देशात यंदा मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होण्याची शक्यता होती; पण यास चक्रीवादळामुळे मान्सून चोवीस तास आधीच म्हणजे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.मालदीव, बंगालच्या उपसागराच्या काही भागांत गुरुवारी मान्सून आणखी पुढे सरकला आहे. त्यामुळे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्यासारखी स्थिती आहे. तौउते व त्यानंतर काही दिवसांनी यास चक्रीवादळाने भारताला तडाखा दिला होता. पश्चिम बंगाल, ओडिशात यासमुळे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मात्र, त्यातून झालेली चांगली गोष्ट म्हणजे मान्सूनचे देशात एक दिवस लवकर आगमन होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्येही संततधारयास चक्रीवादळ आता क्षीण झाले असून, बिहार व उत्तर प्रदेश परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम या चार राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त करीत रेड अलर्टचा इशाराही दिला होता. बिहार, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाबरोबरच काही ठिकाणी गारपीटही झाली. या राज्यांत नागरिकांनी सावधानता बाळगावी, अशीही सूचना देण्यात आली आहे.
पूर्व रेल्वेच्या १५ गाड्या रद्दn यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारमधील जनजीवनावर परिणाम झाला आहे. पूर्व मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. n तिथे चक्रीवादळामुळे अनेक झाडे उन्मळून रेल्वे रुळांवर पडली आहेत, तसेच काही ठिकाणी रुळांखाली माती वाहून गेली आहे. त्यामुळे पूर्व रेल्वेने १५ गाड्या रद्द केल्या आहेत. n सोनपूर, समस्तीपूर भागामध्ये रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यामध्ये जयप्रभा सेतूचा काही भाग कोसळल्याने उत्तर प्रदेश-बिहारमधील रेल्वे वाहतूक काही काळ थांबविण्यात आली आहे. बलिया येथे बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.