मी लवकरच येतोय, मान्सूनचा सांगावा; ७२ तासांमध्ये पश्चिम बंगालमध्ये दाखल हाेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:17 AM2023-05-31T01:17:56+5:302023-05-31T01:18:18+5:30
केरळमध्ये मान्सूनची अद्याप प्रतीक्षाच
नवी दिल्ली : अंदमान आणि निकाेबार बेटांवर ११ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता आगेकूच केली. नैऋत्य बंगाल उपसागराच्या आणखी काही भागांत तो पोहोचला असून, पुढील ७२ तासांमध्ये पश्चिम बंगालमध्ये दाखल हाेण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सूनची अद्याप प्रतीक्षाच आहे. तेथे ४ जूनपर्यंत ताे धडक देऊ शकताे, असे हवामान विभागाने सांगितले.
दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याचा वारा व पावसाने हजेरी लावली. कडकडणाऱ्या वीजा मान्सून लवकरच येत असल्यचा जणू निरोप दिला आहे.
मान्सूनचे १९ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर आगमन झाले हाेते. पुढील २-३ दिवसांत आणखी काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी त्याला परिस्थिती अनुकूल असल्याचे आयएमडीने सांगितले.