ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - पावसाळयाच्या चार महिन्यांपैकी पहिल्या जून महिन्यात पाऊस अपेक्षेपेक्षा थोडा कमी पडला. संपूर्ण देशभरात पाऊस ११ टक्के कमी पडला असे हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सूनला ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा आठ दिवस उशिराने दाखल झाल्याने ही तूट निर्माण झाली.
मान्सूनने ब-यापैकी प्रगती केली असली तरी, मध्यभारतात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. पण जुलैमध्ये ही तूट भरुन निघेल असे भारतीय हवामान खात्यातील मान्सनूचा अंदाज वर्तवणा-या डीय शिवानंद पाई यांनी सांगितले. जुलै महिन्यात मान्सून अधिक सक्रीय होईल अशी हवामान खात्याला अपेक्षा आहे.
जुलै महिन्यात खरीपाच्या पेरण्यात होतात. त्यामुळे जुलैचा पाऊस महत्वाचा आहे. मान्सूनचा पाऊस आठ जूनला दाखल झाला. त्यामुळे आतापर्यंत फक्त तीन आठवडेच पाऊस झाला आहे. जून महिन्यात दक्षिण भारतात चांगला पाऊस झाला. दक्षिणेत सरासरीपेक्षा २२ टक्के अतिरिक्त पाऊस झाला.
उत्तरतेल्या काही भागांमध्ये अजूनही मान्सूनचा पाऊस पोहोचलेला नाही. पण तिथली पावसाची सरासरी फक्त २.४ टक्क्यांनी कमी आहे. कारण या भागात मान्सूनपूर्व चांगला पाऊस झाला होता. पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची सर्वाधिक तूट आहे. इथे जूनमहिन्यात २७.३ टक्के पावासची तूट राहिली. पण ही तूट अनपेक्षित नाही. यावर्षी या भागात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.