शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

ओम बिर्लांची नाराजी दूर; सर्वपक्षीय खासदारांनी काढली समजूत, अध्यक्षस्थानी बसण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 2:09 PM

Parliament Monsoon Session: दोन दिवसांच्या नाराजीनंतर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या आसनावर बसण्यास तयार झाले. जाणून घ्या प्रकरण...

Om Birla News: खासदारांच्या गदारोळामुळे नाराज झालेले लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला दोन दिवसानंतर आज गुरुवारी (3 ऑगस्ट) दुपारी 2 वाजेपासून सभागृहाचे कामकाज हाती घेतील. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांची भेट घेऊन सभागृहाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. सर्व खासदारांनी सभागृहाचा मान ठेवण्याचे आश्वासन दिले. यानंतर लोकसभा अध्यक्षांची नाराजी दूर झाली. 

मंगळवार(1 ऑगस्ट) रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेत खासदारांनी प्रचंड गदारोळ घातला होता. यावेली काही खासदारांनी अध्यक्षांच्या खुर्चीजवळ येऊन पत्रके भिरकावली. यामुळे ओम बिर्ला नाराज झाले. सभागृहातील खासदारांना शिस्त लागेपर्यंत अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर खासदारांनी त्यांची समजूत काढली.

1 ऑगस्टच्या घटनेने लोकसभा अध्यक्ष दुखावलेविरोधक वारंवार गदारोळ करीत असल्यामुळे व लोकसभेच्या कामकाजात अडथळा येत असल्यामुळे आपण दुखावलो आहोत. जोपर्यंत खासदारांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नाही आणि ते संसदेच्या प्रतिष्ठेचे पालन करीत नाहीत, तोपर्यंत आपण लोकसभेत जाणार नाहीत, असे ओम बिर्ला यांनी जाहीर केले. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी ओम बिर्ला यांची नाराजी योग्य ठरवत सरकारमधील मंत्र्यांना त्यांची नाराजी दूर करण्याचे निर्देश दिले.

का उचलले पाऊल? मंगळवारी दिल्ली सेवा संबंधी विधेयकाला विरोध करताना विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे कागद फेकले व वेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. ओम बिर्ला यांनी वारंवार इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. असे वागणे योग्य नाही. यावर चर्चा करण्यासाठी योग्य संधी देणार आहे, असेही बिर्ला सांगत होते. परंतु, विरोधी खासदार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे व अध्यक्षांच्या खुर्चीकडे कागद फेकल्यामुळे दुखावलेल्या ओम बिर्ला यांनी हे पाऊल उचलले आहे.

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाParliamentसंसदMember of parliamentखासदार