शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
3
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
4
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
5
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
7
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
8
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
9
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
10
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
11
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
12
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
13
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
14
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
15
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
16
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
17
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
18
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
19
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
20
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?

कोण म्हणतं आमच्याकडे संख्याबळ नाही?; अविश्वास ठरावावरुन सोनियांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 3:10 PM

शुक्रवारी मोदी सरकारची पहिली अग्निपरीक्षा

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोदी सरकारला अडचणीत आणलं आहे. टीडीपीच्या खासदारांनी सरकारविरोधात आणलेला अविश्वास ठराव लोकसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला आहे. या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार आहे. सरकारविरोधात पुरेसं संख्याबळ नसताना हा प्रस्ताव कसा मंजूर होणार?, असा प्रश्न काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना विचारण्यात आला. यावर कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही?, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अविश्वास प्रस्ताव स्वीकारल्यावर सोनिया गांधी संसदेच्या बाहेर पडल्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना संख्याबळाबद्दल प्रश्न विचारले. 'तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे का? संख्याबळाअभावी तुम्हाला प्रस्ताव मंजूर करुन घेता येणार नाही,' असं पत्रकारांनी म्हटलं. यावर कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही?, असा प्रश्न पत्रकारांनी सोनिया गांधी यांनी विचारला. टीडीपीकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. मोदी सरकारविरोधातील पहिला अविश्वास प्रस्ताव आज लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे. काँग्रेस आणि टीडीपीच्या खासदारांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. पन्नास खासदारांचा पाठिंबा असल्यास अविश्वास प्रस्ताव दाखल करुन घेतला जातो. टीडीपी खासदारांनी दाखल केलेल्या प्रस्तावाला 50 पेक्षा अधिक खासदारांचा पाठिंबा असल्यानं लोकसभेच्या अध्यक्षांनी तो दाखल करुन घेतला. आता या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार आहे.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी