नवी दिल्ली: लोकसभेत केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरमयान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हा प्रस्ताव चुकीच्यावेळी आणला, याचा काँग्रेसला पश्चाताप नक्की होणार. यावेळी त्यांनी विरोधकांवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. तसेच, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर पूर्वोत्तरमध्ये 8000 हून अधिक दहशतवादी/कट्टरतावाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचेही सांगितले.
काँग्रेसला पश्चाताप होणारकिरेन रिजिजू यांनी यावेळी विरोधी आघाडीच्या नावावरही टीका केला. ते म्हणाले की, तुम्ही देशाविरोधात काम करत आहात, त्यामुळे आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवल्याने काही होणार नाही. हा अविश्वास प्रस्ताव हाणून पाडल्यानंतर आम्ही नवीन संसदभवनात शिफ्ट होऊ. या जुन्या संसद भवनात हा शेवटचा अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरल्याच्या घटनेचे आम्ही साक्षीदार होऊ. अविश्वास प्रस्ताव आणण्याचे काही कारण असायला हवे. काँग्रेसला पुढे याचा नक्कीच पश्चाताप होणार, अशी टाकीही त्यांनी यावेळी केली.
2014 नंतर ईश्यान्येतील परिस्थिती बदललीरिजिजू पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवादावर मोठा आळा बसला. पूर्वोत्तरमध्ये 8,000 हून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. AFSPA चे एकूण कव्हरेज क्षेत्र 75% ने कमी केले. तुम्ही मणिपूरबद्दल बोलत असाल तर सर्व बाबी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही देशाची दिशाभूल करत आहात.
ते दिवस गेले...2014 पूर्वी ईशान्येकडील अनेक लोकांना दिल्ली आणि देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये वांशिक भेदभाव आणि अत्याचारांचा सामना करावा लागायचा, 2014 नंतर परिस्थिती बदलली आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच DGP परिषद गुवाहाटीमध्ये झाली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी निर्देश दिले की, पोलिसांनी ईशान्येकडील लोकांच्या सुरक्षेवर विशेष भर द्यावा. ते दिवस गेले जेव्हा परकीय शक्ती भारताने काय करावे आणि काय करू नये हे सांगायचे. आज कोणतीही परदेशी शक्ती आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असंही रिजिजू यावेळी म्हणाले.