शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राज्यात शेतकऱ्याचे मासिक उत्पन्न ७,३८६ रुपये

By admin | Published: June 09, 2017 6:01 AM

उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या गळ््याला फासासारखे ठरले आहे.

नितीन अग्रवाल। लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांना पिकाला ते घेण्यास आलेल्या खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या गळ््याला फासासारखे ठरले आहे. परंतु सरकारकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही योजना नाही, असे कृषी मंत्रालयाकडील अधिकृत दस्तावेजावरून म्हणता येते. हा दस्तावेज ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.कृषी मंत्रालयाच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची सगळी जबाबदारी राज्य सरकारांची आहे. तथापि, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज, कीटकनाशके, खते, शेतीची अवजारे आणि कृषी कर्ज दिले जाते. याशिवाय सवलतीच्या दरात पीक विम्याची सोयही आहे.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पिकांना किमान हमी भाव मिळण्यासाठी सुरू असलेली आंदोलने सरकार राजकीय कट म्हणत असले तरी प्रत्यक्षात जबाबदारी झटकत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्याची अवस्था दयनीय आहे. केंद्र सरकारकडून वेगवेगळ््या योजना राबवण्यासाठी राष्ट्रीय नमुना पाहणी करण्यात आली. त्यानुसार शेतकरी शेतीतून दररोज १३५ रुपयेच कमावतो. ही कमाई अकुशल कामगाराला मिळणाऱ्या मजुरीपेक्षाही कमीच आहे. पाहणीत शेतकऱ्याचे कुटुंब दरमहा सरासरी ६ हजार ४२६ रुपये कमावते. यात त्याला पिकापासून ४ हजार ७४ रुपयेच मिळतात. याशिवाय पशूपालनातून २३८ रुपये तो कमावतो. इतर शेती कामांतून तो जवळपास ७० रुपये व शेतीतर कामातून ३०२ रुपये कमावतो. याशिवाय अतिरिक्त मजुरी करून तो उत्पन्नात १,४१३ रुपये आणि इतर आर्थिक कामे करून तो ३२८ रुपयांची भर घालतो. वर्ष २०१४ च्या शेवटी प्रसिद्ध केलेल्या या आकडेवारीनुसार शेतकरी कुटुंबाचा खर्च दरमहा ६ हजार २२३ रुपये दाखवण्यात आला आहे.कृषी मंत्रालयाने संसदेत नुकतीच ही वस्तुस्थिती मान्य केली की शेतीतून रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या दशकात कृषी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली. २००१ मध्ये २३४.१ दशलक्ष लोक शेतीत काम करीत होते तर २०११ मध्ये ती संख्या २६३.१ दशलक्ष झाली.>कृषी क्षेत्रातील रोजगारात वाढमहाराष्ट्रातील शेतकरी दरमहा ७ हजार ३८६ रुपये कमावतो. पंजाबच्या शेतकऱ्याचे हेच उत्पन्न १८ हजार ५९ रुपये आहे. यानंतर हरयाना (१४,४३४ रुपये) जम्मू-काश्मीर (१२,६८३), केरळ (११,८८८) आणि मेघालयातील (११७९२) शेतकरी आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी दरमहा सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडेसे जास्त ७,३८६ रुपये कमावतो. मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याचे सरासरी उत्पन्न ६ हजार २१० रुपये आहे.कृषी मंत्रालयाने संसदेत ही वस्तुस्थिती मान्य केली की शेतीतून रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या दशकात कृषी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली. २००१ मध्ये २३४.१ दशलक्ष लोक शेतीत काम करीत होते तर २०११ मध्ये ती संख्या २६३.१ दशलक्ष झाली.