शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

चंद्र अन् नोकऱ्या; अवकाश अर्थव्यवस्था कशी झेपावणार..?, जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 9:05 AM

चंद्रयान-१ ने सर्वप्रथम चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याची पुष्टी केली होती.

भारताच्या चंद्रयान मोहिमेच्या अभूतपूर्व यशानंतर जगभरात चंद्र हा चर्चेचा विषय ठरला. आजवर चंद्राबाबत झालेले संशोधन आणि आता इस्रोने चंद्रावर उपलब्ध असलेल्या विविध रासायनिक घटकांबाबत जारी केलेल्या माहितीवरून चंद्रकेंद्रित अर्थव्यवस्था नव्याने उभारी घेत आहे.

काय आहे आर्थिक महत्त्व?

चंद्रयान-१ ने सर्वप्रथम चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याची पुष्टी केली होती. आता चंद्रयान-३ ने तेथे ऑक्सिजनसह गंधक, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, टिटॅनियम, क्रोमियम, मँगनीज, सिलिकॉन आदी धातूंचे अवशेष सापडल्याचे म्हटले. तत्पूर्वी चंद्रावर हायड्रोक्झिलचे पुरावे आढळल्याने ते हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा उत्तम स्रोत असून त्याचा रॉकेट फ्यूएल म्हणून वापर होतो. अणुऊर्जेचा उत्तम पर्याय असलेला हेलियम चंद्रावर मोठ्या प्रमाणात असल्याचे नासाने म्हटले होते. स्कॅंडियम, येट्रियम, टिट्रियमसारख्या धातूंमुळे डिजिटल क्षेत्राला बळ मिळेल. हे सर्व घटक पृथ्वीवर कसे आणता येतील, त्यावर सध्या अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे.

अवकाश अर्थव्यवस्था कशी झेपावणार..?अन्य देशांच्या तुलनेत भारताच्या अवकाश मोहिमा कमी खर्चात होते. त्यातच भारताने चंद्रमोहीम यशस्वी केल्याने अनेक देशांकडून अधिक संशोधनासाठी भारतासोबत करार करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. त्यातून देशात मोठी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. अवकाश क्षेत्रात सखोल संशोधनासाठी उच्च कौशल्याधारित मनुष्यबळाची मोठी आवश्यकता असते. उदा. इस्रोही त्यांच्या मोहिमांसाठी विज्ञान- अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक कंपन्यांसोबत एकत्रित काम करते. देशात अवकाश संशोधनात केवळ इस्रोच नव्हे, तर सुमारे १४० हून नोंदणीकृत स्टार्टअप कंपन्या कार्यरत आहेत. त्यात स्कायरूट, सॅटशुअर, ध्रुव स्पेस, बेलाट्रिक्स आदी कंपन्या कार्यरत आहेत. 

चंद्रावर नाही कुणाचा हक्क२७ जानेवारी १९६७ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने केलेल्या ठरावानुसार, कोणताही देश चंद्रावर हक्क सांगू शकत नाही. मात्र, संशोधन करण्यास कोणालाही आडकाठी नाही.

चंद्रावर मानवी मोहीम कधी? नासाने शेवटची चंद्रावरील मानवी मोहीम १९७२ मध्ये अपोलो १७ ही राबवली होती. आता नासा पुन्हा एकदा २०२४ च्या अखेरपर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवी मोहीम राबवणार आहे. 

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोEconomyअर्थव्यवस्था