भावनगर : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी 5 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी 12 वाजता पूजा करून मंदिर बांधणीसाठी पायाभरणी करतील. यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
राम मंदिराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी पाच कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, राम मंदिरासाठी देशातील सर्व हिंदूंकडून पैसे गोळा केले जातील, असे विश्व हिंदू परिषद म्हटले आहे.
भावनगरमधील तलगाजरडामध्ये डिजिटलच्या माध्यमातून मोरारी बापू यांनी रामकथा वाचन केले. यावेळी व्यासपीठावरुन राम मंदिर बांधण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली. सर्वात आधी रामजन्मभूमीसाठी पाच कोटी पाठविले जातील, जे भगवान श्री राम यांच्या चरणी तुळशीपत्र म्हणून भेट दिली जाईल, असे मोरारी बापू यांनी सांगितले.
मोरारी बापू यांनी रामकथा वाचन केल्यानंतर सांगितले की, चित्रकूट धाम तलगाजरडा येथील आश्रमशाळेच्या वतीने रामजन्मभूमीसाठी पाच लाख रुपये दिले जातील. तसेच, जे कोणी श्री रामांचा भक्त असतील आणि राम मंदिरासाठी दान देऊ इच्छित असतील तर त्याच्या वतीने पाच कोटी रुपयांची देणगी दिली जाईल.
याशिवाय, राम मंदिर बांधण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील लोकांकडून देणगी गोळा केली जाईल, जेणेकरून राम मंदिराचे बांधकाम लोकसहभागातून होईल आणि त्यात सर्व हिंदूंचे पैसे असतील, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले.
आणखी बातम्या...
राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित
'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!