Gujarat Morbi Bridge Collapse:गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेत सूमारे 135 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. दुर्घटनेवेळी पुलावर जवळपास 500 लोक होते. यातील अनेकांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेवेळी एका तरुणाने मोठे शौर्य दाखवत 60 लोकांचा जीव वाचवला. विशेष म्हणजे, दुर्घटनेवेळी हा तरुण त्या पुलावरच होता.
60 लोकांचा जीव वाचवला30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास मोरबी शहरातील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला ऐतिहासिक पूल अचानक नदीत कोसळला. अपघाताच्या पाच दिवसांपूर्वीच हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. रविवार असल्याने पुलावर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी अचानक पूल तुटल्याने सगळे नदीत पडले. यावेळी पुलावर असलेल्या नईम शेख नावाच्या जीगरबाज तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालत सूमारे 60 लोकांचा जीव वाचवला.
राज्यभरात दुखवटा जाहीरगुजरात सरकारने मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी शोक जाहीर केला आहे. या दुर्घटनेनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. 2 नोव्हेंबर रोजी राज्यात राष्ट्रीय ध्वज अर्धवट राहील आणि कोणताही सरकारी समारंभ होणार नाही.