गेल्या काही दिवसांपासून देशातून धडकी भरवणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी समोर येताना दिसत आहे. सध्या देशात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंदही होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यानी आता पुन्हा एकदा कठोर निर्बंध घालण्यास सुरूवात केली आहे. देशात गेल्या चोवीस तासांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८०० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यूही झाल्याचं समोर आलं आहे.देशात गेल्या चोवीस तासांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली असून १ लाख ५२ हजार ८७९ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ८३९ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे गेल्या चोवीस तासांमध्ये ९० हजार ५८४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. दरम्यान, ही देशातील आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ आहे.
कोरोनाचा कहर : आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ; देशात चोवीस तासांत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 11:11 IST
Coronavirus Updates : देशात आतापर्यंत सर्वात मोठी रुग्णवाढ, ८३९ रुग्णांचा मृत्यू
कोरोनाचा कहर : आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ; देशात चोवीस तासांत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद
ठळक मुद्देदेशात आतापर्यंत सर्वात मोठी रुग्णवाढ८३९ रुग्णांचा मृत्यू