नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतच चालला आहे. मात्र, याच बरोबर रिकव्हरी रेटही वाढत असल्याचे दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसा, देशात आतापर्यंत 5.53 लाखहून अधिक लोक बरे झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 850 लोक बरे झाले आहेत. ताज्या आंकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तब्बल 63 टक्क्यांहून अधिक लोक बरे झाले आहेत. Corona virus in India
केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्यान मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत तब्बल 28 हजार 701 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. या दरम्यान देशातील 500 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ताज्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी (13 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 8 लाख 78 हजार 254 कोरोनाबाधित समोर आले आहेत. यापैकी सध्या 3 लाख 01 हजार 609 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर 5 लाख 53 हजार 470 एवढे रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 23 हजार 174 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्राची स्थिती गंभीर -आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. येथील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 2 लाख 54 हजार 427वर पोहोचला आहे. राज्यात सध्या 1 लाख 03 हजार 813 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एकूण 1 लाख 40 हजार 325 रुग्म बरे होऊन घरी गेले आहेत. येथे आतापर्यंत 10 हजार 289 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. Corona virus in Maharashtra
तामिळनाडूतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 46 हजार 972 -महाराष्ट्रानंतर क्रमांक लागतो तो तामिळनाडू राज्याचा. येथे आतापर्यंत तब्बल 1 लाख 38 हजार 470 करोनाबाधित समोर आले आहेत. सध्या येथे 46 हजार 972 अॅक्टिव कोरोनाबाधित आहेत. तर 89 हजार 532 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय येथे आतापर्यंत 1 हजार 966 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 19 हजार 155 - दिल्लीचा विचार करता, दिल्लीत आतापर्यंत एकूण 1 लाख 12 हजार 494 कोरोना रुग्ण समोर आले आहेत. येथील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 19 हजार 155 एवढी आहे. येथे आतापर्यंत 89 हजार 968 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत आतापर्यंत 3 हजार 371 कोरोना बाधितांचा आपला जीव गमवावा लागला आहे. Corona virus in Delhi
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...
धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा
ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर
CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'