शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

50 टक्क्यांहून अधिक तरुण मित्रांमध्ये 'कूल' दिसण्यासाठी ओढतात सिगारेट - सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 12:51 PM

देशभरातील 50 टक्के तरुण-तरुणी फक्त यासाठी धूम्रपान करतात कारण त्यांचं म्हणणं आहे की, यामुळे तणाव कमी होतो तसंच मित्रांमध्ये 'कूल' इमेज तयार होते. एका सर्व्हेक्षणानुसार, 52 टक्के तरुणांनी धुम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते असा दावा केला आहे.

ठळक मुद्दे52 टक्के तरुणांनी धुम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते असा दावा केला आहे80 टक्क्यांहून जास्त जणांचं एकदा धुम्रपान करण्यात काहीच हरकत नसल्याचं म्हणणं आहेसहा राज्यांमधील 1900 शाळकरी विद्यार्थी या सर्व्हेत सहभागी झाले होते

नवी दिल्ली - देशभरातील 50 टक्के तरुण-तरुणी फक्त यासाठी धूम्रपान करतात कारण त्यांचं म्हणणं आहे की, यामुळे तणाव कमी होतो तसंच मित्रांमध्ये 'कूल' इमेज तयार होते. एका सर्व्हेक्षणानुसार, 52 टक्के तरुणांनी धुम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते असा दावा केला आहे. तर 90 टक्के तरुणांनी सांगितलं आहे की, जर त्यांच्या आई-वडिलांनी धुम्रपानास विरोध केला नाही तर ते धुम्रपान करणं सुरु ठेवतील. दुसरीकडे 80 टक्क्यांहून जास्त जणांचं एकदा धुम्रपान करण्यात काहीच हरकत नसल्याचं म्हणणं आहे.

सहा राज्यांमधील 1900 शाळकरी विद्यार्थी या सर्व्हेत सहभागी झाले होते. सर्व्हेत सहभागी झालेल्या 75 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की, जेव्हा कधी त्यांचे मित्र सिगारेट पिण्यासाठी आग्रह करतात, तेव्हा त्यांना नकार देणं कठीण जातं. 46 टक्के विद्यार्थ्यांनी तर आपण मित्रांमध्ये कूल दिसावं यासाठी सिगारेट ओढण्यास सुरुवात केल्याचं कबूल केलं आहे. 

'वडिलांसाठी ठीक तर मग माझ्यासाठीही'फोर्टिज रुग्णालयाचे मनोरुग्ण विभागातील डॉक्टर समीर पारिख यांनी सांगितलं की, तरुणांमधील स्मोकिंगचं व्यसन आणि त्यांची समज जाणून घेण्याच्या हेतूने मी हे सर्व्हेक्षण केलं. यावेळी तरुण-तरुणींना काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी 87 टक्के शाळकरी विद्यार्थ्यांनी अभिनेत्यांना स्मोकिंग करताना पाहून आपल्याला स्मोकिंग करावंस वाटत असल्याचं सांगितलं. 89 टक्के मुलांनी जर स्मोकिंग करणं आपल्या वडिलांसाठी ठीक आहे तर मग आपल्यासाठीही चांगलंच असेल असं सांगितलं. 79 टक्के तरुण-तरुणींनी धुम्रपान विरोध अभियानात सेलिब्रेटी सामील झाल्याने स्मोकिंग सोडण्यास मदत मिळत असल्याचं सांगितलं आहे. तर 60 टक्क्यांहून जास्त तरुणांचा दावा आहे की, स्मोकिंगचे दुष्पपरिणाम सांगितल्यास ते थांबवण्यास मदत मिळू शकते. 

दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यूजागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, स्मोकिंगमुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू होतो. जगभरात 2015 मध्ये झालेल्या 64 लाख मृत्यूंपैकी 11 टक्के मृत्यू स्मोकिंगमुळे झाले. भारत, चीन, रशिया आणि अमेरिकेत स्मोकिंगमुळे 52.2 टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. स्मोकिंगमुळे होणा-या मृत्यूमध्ये 90 टक्के मृत्यू फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे होतात. तर 17 टक्के मृत्यू ह्रदयाच्या रोगामुळे होतात.  

टॅग्स :Smokingधूम्रपानCigaretteसिगारेट