नवी दिल्ली - देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. तर काही ठिकाणी काम नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच दरम्यान काही कंपन्यांनी नोकरी भरती सुरू असल्याची जाहिरात दिली आहे. सोशल मीडियावर अशा अनेक जाहिरात ही सातत्याने येत असतात. सध्या नोकरी जाणार असं संकट असल्याने लोक लगेचच अशा जाहिरातींकडे आकर्षित होतात.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमध्ये मोठी भरती असलेली एक जाहिरात जोरदार व्हायरल होत आहे. कोरोना संकटात नोकरी मिळत असल्याने अनेकांनी त्या जाहिरातीचा गांभीर्याने विचार केला. तसेच काही वृत्तपत्रांमध्ये देखील त्याविषयी माहिती देण्यात आली होती. रेल्वे 5000 हून अधिक नोकऱ्या देणार असल्याचं या जाहिरातीमध्ये म्हटलं होतं. मात्र या बाबत अधिक तपास केला असता ही जाहिरात खोटी असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो अर्थात पीआयबीने देखील ही जाहिरात खोटी असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेल्वेच्या वतीने देण्यात आलेल्या त्या खोट्या जाहिरातीतून बेरोजगारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रेल्वेने नोकरभरतीसाठी अशी कोणतीही जाहिरात केली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच या खोट्या जाहिरातीविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.
कोरोनाच्या काळात लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न हा या खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. नोकरीचं अमिष दाखवून पैसे मागितले जात आहेत. मात्र लोकांनी अशा थापांना बळी पडू नये असं सांगण्यात येत आहे. त्यासोबतच सोशल मीडियावर सध्या अफवा पसरवणारे बरेच मेसेज येत आहेत. खात्री केल्याशिवाय असे मेसेज इतरांना पाठवू नयेत. एका हिंंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनावर मात केल्यावर शिवराज सिंह चौहान करणार प्लाझ्मादान
शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीला बंदी, FSSAI चा मोठा निर्णय
शाब्बास पोरी! सर्व विषयात जबरदस्त गुण पण गणितात मात्र 2, पुनर्तपासणीत मिळाले पैकीच्या पैकी
CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी
"राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचं नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला बनवा", काँग्रेस नेत्याचा सल्ला