भुवनेश्वर : लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या पाच लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांनी ओडिशामध्ये परत येण्यासाठी आपल्या नावाची राज्य सरकारच्या वेबसाइटवर नोंदणी केली आहे. इतके लोक लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर, परत आल्यास राज्यातील क्वारंटाइनची व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ओडिशा सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, ओडिशाचे मूळ रहिवासी असलेल्या सुमारे साडेपाच लाख स्थलांतरित मजुरांनी लॉकडाऊन उठल्यानंतर राज्यात पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ओडिशामध्ये परत येऊ इच्छिणाºया मजुरांचा आकडा आणखी किती वाढेल, हे याक्षणी सांगणे कठीण आहे.ओडिशात क्वारंटाइनमध्ये २.२ लाख लोकांना ठेवता येईल इतकी जय्यत तयारी सरकारने केली आहे. त्यासाठी ७,१२० तात्पुरती वैद्यकीय केंद्रे उभारली आहेत. ओडिशात विविध राज्यांतून परतणाºया स्थलांतरित मजुरांना तिथे १४ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. याआधी ओडिशा सरकारने वेगळा विचार केला होता. लॉकडाऊन उठल्यानंतर जे मजूरराज्यात परत येतील त्यांना होमक्वारंटाइन करण्यात येणार होते; मात्र होम क्वारंटाइनमध्ये असलेले लोक बंधने न पाळता बाहेर भटकतात व त्यामुळे साथीचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे.
पाच लाखांहून अधिक मजुरांची ओडिशात परतण्यासाठी नावनोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:57 AM