शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बापरे...! मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 8:02 PM

देशात सध्या 2.38 लाख एटीएम आहेत. यापैकी 1.13 लाख मशिन बंद होण्याची शक्यता

मुंबई : भारतातील बदललेल्या नियमांमुळे पुढील वर्षीच्या मार्चअखेरीस देशातील निम्मे एटीएममशीन बंद कराव्या लागणार असल्याचा इशारा सीएटीएमआय संघटनेने दिला आहे. 

देशात सध्या 2.38 लाख एटीएम आहेत. यापैकी 1.13 लाख मशिन बंद होण्याची शक्यता सीएटीएमआय संघटनेचे संचालक व्ही बालासुब्रमण्यन यांनी सांगितले. असे झाल्यास या उद्योगाशी संबंधित हजारो लोकांवर बेरोजगारीची समस्या उद्भवणार आहे. यामुळे सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या प्रयत्नांनाही खीळ बसणार आहे. 

बंद होणाऱ्या मशिनमध्ये एक लाख ऑफ साईट एटीएम आणि 15 हजार व्हाईट लेबल एटीएमचा समावेश आहे. ही एटीएम बंद झाल्यास ग्रामीण आणि शहरी नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. 

ऑफ साइट एटीएम म्हणजे जे एटीएम रहिवासी भाग आणि बाजारांमध्ये बसविलेली असतात. या एटीएमसोबत बँकेची ब्रांच नसते. तर व्हाईट लेबल म्हणजे नॉन बँकिंग कंपन्यांकडून बसविण्यात आलेली एटीएम होय. 

नोटाबंदीसारखा प्रसंग ओढवेलबालासुब्रमण्यन  यांनी सांगितले की, या बंदीचा परिणाम नोटाबंदी सारखा असणार आहे. कारण सबसिडीसह अन्या कारणासाठी पैसे हे एटीएमद्वारे काढण्यात येतात. ग्रामीण भागात अद्याप रोख रक्कमेवरच व्यवहार चालतात. यामुळे पैसे काढण्यासाठी लाभार्थी एटीएमचा वापर करतात. यामुळे सुरु असणाऱ्या एटीएमवर नोटाबंदीसारखीच रांग लागण्याची शक्यता आहे. 

आरबीआयने एटीएमसंबंधीत नियमांमध्ये बदल केले आहेत. यानिसार रोख व्यवस्थापनाची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि मशिनमध्ये रोख रक्कम ठेवण्याची कॅसेट बदलण्यासाठी सीएटीएमआयला जबरदस्तीने एटीएमच्या सॉफ्टवेअरमध्ये आणि हार्डवेअरमध्ये बदल करावे लागत आहेत. यासाठी 3500 कोटींचा अतिरिक्त खर्च येणार आहे. 

काय आहेत हे नियम?नव्या नियमांनुसार एटीएम सर्व्हिस प्रोव्हायरची एकूण संपत्ती कमीत कमी 100 कोटी असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्याकडे 300 कॅश व्हॅन असायलाच हव्यात. प्रत्येक व्हॅनमध्ये दोन सुरक्षारक्षक आणि दोन बंदुकधारी सुरक्षारक्षक एका चालकासह असणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक व्हॅनमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही प्रणाली बसवावी लागणार आहे. याशिवाय सर्व एटीएम मशिनमध्ये विंडोज एक्सपीवरून विंडोज 10 अपग्रेड करावी लागणार आहे. 

टॅग्स :atmएटीएमbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNote Banनोटाबंदी