उर्दू ऐवजी इंग्रजीच्या जादा प्रश्नपत्रिका आल्याने तासभर पुढे ढकलला विज्ञानचा पेपर का.उ.कोल्हे केंद्रातील प्रकार : १० वीच्या ९६० विद्यार्थ्यांना नाहक त्रास
By admin | Published: March 16, 2016 8:33 AM
जळगाव- शहरातील का.उ. कोल्हे विद्यालयातील परीक्षा केंद्रावर उर्दू भाषा ऐवजी इंग्रजीच्याजादा प्रश्नपत्रिका आल्याने १० वीचा विज्ञान भाग २ चा पेपर तासभर उशिराने सुरु झाला. झेरॉक्स करुन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरीत करण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर सोडविला.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
जळगाव- शहरातील का.उ. कोल्हे विद्यालयातील परीक्षा केंद्रावर उर्दू भाषा ऐवजी इंग्रजीच्याजादा प्रश्नपत्रिका आल्याने १० वीचा विज्ञान भाग २ चा पेपर तासभर उशिराने सुरु झाला. झेरॉक्स करुन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरीत करण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर सोडविला.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.१० वीचा विज्ञान भाग- २ चा ४० गुणांचा पेपर मंगळवारी सकाळी ११ वाजता घेण्याचे नियोजन होतेव दुपारी १ वाजता पेपर सुटण्याची वेळ होती. का.उ.कोल्हे विद्यालयातील परीक्षा केंद्रात उर्दू माध्यमाचे ३६७ तर मराठी, इंग्रजी व उर्दू मिळून ९६० परीक्षार्थी होते. ४२० उर्दू प्रश्नपत्रिका हव्या होत्या, आल्या फक्त १६०उर्दू माध्यमाच्या ३६७ विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त धरून ४२० उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका यायला हव्या होत्या. परंतु फक्त १६० प्रश्नपत्रिका आल्या. रॅपर उर्दूचे मात्र प्रश्नपत्रिका इंग्रजीतूनउर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्यावर वरच्या भागात उर्दूचे रॅपर होते. पण मध्ये फक्त १६० प्रश्नपत्रिका उर्दू होत्या तर उर्वरित २६०इंग्रजीमाध्यमाच्या प्रश्नपत्रिकाहोत्या. त्यामुळेगोंधळउडाला.बोर्डाशी संपर्क साधून पेपर थांबविलाउर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका कमी असल्याचे लक्षात घेता केंद्रप्रमुख ए.व्ही.ठोसर व इतर अधिकार्यांनी लागलीच आर.आर.विद्यालयातील १० वी बोर्डाच्या कस्टडीशी संबंधित अधिकार्यांसह नाशिक येथील वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. वरिष्ठांनी केंद्रातील उर्दू माध्यमासह इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा पेपर पुढे ढकलण्याची सूचना केली. त्यानुसार केंद्रातील सर्वच ९६० विद्यार्थ्यांचा पेपर थांबविण्यात आला. एक तास उशिर, झेरॉक्स प्रश्नपत्रिका आणल्याउर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या कस्टडीशी संबंधितांनी लागलीच झेरॉक्स प्रश्नपत्रिकांची व्यवस्था केली. २६० प्रश्नपत्रिका झेरॉक्स स्वरूपात आणल्या. ही प्रक्रिया होईपर्यंत ११.४५ वाजले होते. नंतर नियोजीत वेळेपेक्षा तासभर उशिराने म्हणजेच १२ वाजता उर्दूसह इतर माध्यमाच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वितरण झाले.त्यानंतरपेपरसुरुझाला.पालक ताटकळलेदुपारचा१ वाजला तरी आपले पाल्य पेपर देऊन बाहेर येत नसल्याने अनेक पालकांनी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. नंतर केंद्रातील अधिकार्यांनी पालकांना प्रश्नपत्रिकांसंबंधी झालेल्या घोळाची माहिती दिली. दुपारी २ वाजता पेपर सुटला. अर्थातच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वेळ भरून काढण्यात आली. कोट-उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका निर्देशापेक्षा कमी आल्या होत्या. अशा स्थितीत आपण फक्त इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे उचित नव्हते.पेपर एक तास उशिराने सुरुझाला. पण त्यात कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान झाले नाही. -ए.व्ही.ठोसर, केंद्रप्रमुख, का.उ.कोल्हे विद्यालय