जगभरात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर अनेक देशांनी त्यावर मात करण्यासाठी लस विकसित करण्याचं काम सुरू केलं होतं. भारतानंही कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याचं काम हाती घेतलं होतं. भारताला त्यात यशही मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींना मंजुरी दिली. उद्यापासून या देशभरात लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवातही होणार आहे. दरम्यान, गुरूवारी सीरम इन्स्टीट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. गेल्या काही महिन्यांपासून दिवसरात्र काम करत असलेले पुनावाला यादरम्यान उत्साहित वाटत होते. तसंच त्यांनी त्यांची पत्नी नताशा, त्यांची मुलं आणि अन्य कुटुंबीयांसह आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या पत्नीनं सोशल मीडियावर या आनंदाच्या क्षणाचा एक फोटो शेअर करत आपल्या पतीसाठी खास संदेशही लिहिला आहे."या पावरहाऊसला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा आणि माझे रॉक अदर पुनावाला हे या क्षणाचा आनंद घेत आहेत. हा क्षण अनेक महिन्यांच्या दिवसरात्रीच्या मेहनतीनंतर आला आहे. अजून पुढे महत्त्चाचा पल्ला गाठायचा आहे. यानंतर चांगली झोप लागेल अशी आशा करते," असा संदेश अदर पुनावाला यांच्या पत्नीनं लिहिला आहे.
कुटुंबीयांसोबत अदर पुनावाला यांनी साजरा केला वाढदिवस; पत्नी म्हणाली,"अजून मोठा पल्ला गाठायचाय, मग..."
By जयदीप दाभोळकर | Published: January 15, 2021 4:32 PM
गेल्या अनेक दिवसांपासून पुनावाला करत होते कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याचं काम
ठळक मुद्देगुरूवारी पुनावाला यांनी साजरा केला ४० वा वाढदिवसगेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लस विकसित करण्याचे दिवसरात्र सुरू होते प्रयत्न