गेल्या काही दिवसापासून जम्मू काश्मिरमध्ये अतिरेकी हल्ल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या हल्ल्यात जवान शहीदही झाले आहे. यावरुन आता खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली. 'डोडा एलओसीपासून खूप दूर आहे आणि तेथे दहशतवादी कसे पोहोचत आहेत?', असा सवालही ओवेसी यांनी केला.
तेलंगणातील विकाराबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या ५० हून अधिक जवानांना ठार केले. आजही नियंत्रण रेषेवर आपण एक सैनिक गमावला आहे. भाजप आता पाकिस्तानचे नाव का घेत नाही? जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये हल्ला होत आहे. डोडा एलओसीपासून दूर, दहशतवादी तिथे कसे पोहोचले? मात्र, भाजप याबाबत काही बोलत नाही, असंही ओवेसी म्हणाले.
विकसित भारत २०४७ हेच लक्ष्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांची भूमिका राहणार महत्त्वाची
रोजगाराच्या मुद्द्यावरून ओवेसींनी केंद्र सरकार आणि भाजपलाही धारेवर धरले. ते म्हणाले की, आज नोकऱ्या नाहीत. लाखो तरुण नोकरी शोधत नाहीत कारण त्यांना माहित आहे की ते त्यांना मिळणार नाही.
शनिवारी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक झाली, यामध्ये सुरक्षा कर्मचारी मोहित राठौर शहीद झाले. या चकमकीत एका मेजरसह चार जवान जखमी झाले आहेत. माछिल सेक्टरजवळील जंगल परिसरात ही चकमक झाली आणि एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला.
पाकिस्तातील तहशतवाद्यांची घुसखोरी
एनएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीम दहशतवाद्यांची घुसखोरी करत होती. एसएसजी कमांडोसह BAT आणि पाकिस्तानी लष्कराचे जवान दहशतवादी संघटनांसोबत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठवत होते. कुपवाडा येथील कामकरी भागात सुरक्षा दलांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली आणि त्यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला.