शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

सरसकट दारूबंदीमुळे प्रश्न कदापि सुटणार नाहीत

By admin | Published: February 01, 2015 1:21 AM

सरसकट दारूबंदी केल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, त्याऐवजी नियंत्रण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले.

सुरेश गुदले ल्ल पणजीसरसकट दारूबंदी केल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, त्याऐवजी नियंत्रण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले. हिवरेबाजार (जि. अहमदनगर) येथील जलसंवर्धनाच्या कामामुळे देशभर परिचित झालेले पवार येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. गोवा आणि दारूच्या समीकरणाविषयी जगभर एक प्रतिमा तयार झाली आहे. गोवा म्हणजे मौजमजा, असेही म्हटले जाते. पोपटराव पवार यांनी व्यसनमुक्तीसाठीही काम केलेले असल्याने त्यांना दारूबंदी विषयावर बोलते केले. तेव्हा युरोपीयन देशांत सर्व कुटुंबीय एकत्र बसून दारू पितात. मात्र युरोप व भारतात मोठे सांस्कृतिक अंतर आहे. आनंद झाला म्हणून दारू प्यायची, मग नोकरी मिळाली यासारखी कारणेही पुरेशी ठरतात. दु:ख झाले म्हणून दारू पिली जाते. दोन्हीही बाबी अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नानाविध कारणांमुळे ‘डिप्रेशन’ वाढल्यानेही लोक व्यसनांच्या आहारी जातात, असे ते म्हणाले. शालेय स्तरावर व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगायला हवेत. हिवरेबाजार येथे आम्ही अशा प्रकारे प्रबोधन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधन करणे हाच व्यसनमुक्तीवर योग्य व शाश्वत पर्याय असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की शालेय मुलांना, तरुणांना काही वर्षांपूर्वी व्यायामशाळा, क्रीडांगणे, मनोरंजनाची सशक्त साधने यांसारखे अनेक पर्याय होते. त्यामुळे अन्य क्षेत्रांमध्ये तरुणाई गुंतली जात होती. मात्र आता शहरांतील चित्र बदलले आहे. अनेक औषधांमध्येही अल्कोहोलचा वापर केलेला असतो़ त्यामुळे पूर्ण दारूबंदीपेक्षा नियंत्रण महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नानाविध कारणांमुळे ‘डिप्रेशन’चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जाते. प्रबोधन हाच त्यावर उपाय आहे. - पोपटराव पवार, सामाजिक कार्यकर्ते