नवी दिल्ली : भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष लोक हे हिंदूविरोधक आणि मुस्लीम समर्थक आहेत. ते कट्टरपंथी हिंदूंच्या कामावर टीका करतात. मात्र, कट्टर मुस्लिमांना पाठीशी घालतात, असे वादग्रस्त विधान प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.भारतातील वाढत्या असहिष्णुतेसोबतच अनेक मुद्द्यांवर त्यांनी एका मुलाखतीत मन मोकळे केले. येथील वाढत्या असहिष्णुतेवर त्यांनी चिंता व्यक्त केली असून, सध्या देशात ज्या पद्धतीची धर्मनिरपेक्षता अनुभवण्यास येत आहे ती चुकीची असल्याचे तस्लिमा यांचे मत आहे.लेखक हे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील तसेच दक्ष असतात. त्यांना इतर कुणी विरोधाची पद्धत सांगण्याची गरज नाही. यात काहीही चुकीचे नाही. बऱ्याचदा एखाद्याला कल्पना सुचते आणि मग इतर लोक त्याचे अनुकरण करतात. आपणास लक्ष्य बनविण्यात आले तेव्हा लेखकांनी मौन पाळले, असे वाटते काय? या प्रश्नाला उत्तर देताना तस्लिमा यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या पुस्तकावर बंदी आली तेव्हा बहुतांश लेखक चूप होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि येथे राहण्याच्या अधिकारासाठी माझा एकाकी लढा सुरू आहे.
भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष लोक हिंदूविरोधी - तस्लिमा
By admin | Published: October 18, 2015 1:38 AM