मुंबई : भारतीय बॉक्स आॅफिसवर ३८५ कोटी व ओव्हरआॅल ग्रॉस ७४२ कोटी कमाई करणारा आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाने अनेक विक्रम नोंदविले आहे. दंगलची कमाई पाहता अभिनेता आमिर खान देशात व विदेशात सर्वाधिक कमाई करणारा स्टार ठरला आहे. परदेशात कलेक्शनचे आकडे पाहिल्यास याबाबतीत आमिर खानेन बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला मागे टाकले आहे. तर देशात त्याने सलमान खानला धोबीपछाड दिला आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार अभिनेता शाहरुख खानचे चित्रपट परदेशात सर्वाधिक पाहिले जात होते मात्र दंगलने त्याला बरेच मागे टाकले आहे. ‘दंगल’च्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख खानचे चित्रपट ५० ते ६५ कोटीपर्यंत कमाई करीत असल्याचे दिसते. मात्र चित्रपटगृहांची वाढलेली संख्या, चाहत्यांच्या आवडीत झालेला बदल व परिस्थिती यासाठी कारणीभूत ठरली आहे. आमिर खानचा थ्री इटिएट व सलमान खानचा बॉडिगार्ड हे चित्रपट परदेशातील बॉक्स आॅफिसवर गेमचेंजर ठरले आहेत.
बॉक्स आॅफिस कलेक्शनच्या फुटफॉलचा आधार घेतल्यास साडेचार कोटी लोकांनी दंगल, चार कोटी लोकांनी सुल्तान व दोन कोटी लोकांनी रईस हा चित्रपट पाहिला आहे. देशभरातील वितरकांची आकडेवारी दैनिक भास्कर या वर्तमान पत्राने प्रसिद्ध केली आहे. आमिर खानने लोकप्रियतेसोबतच व्यवसायिक आकडेवारीमध्ये सलमान खान याला व त्याने शाहरुखला मागे टाकल्याचे दिसते. व्यवसायाचा आधार घेतल्यास शाहरुखला दोघांनी पछाडले आहे असे म्हणावे लागेल.
आमिर खानचा दंगलपूर्वीचा पीके हा चित्रपट २०१४ मध्येरिलीज झाला होता. दोन वर्षानंतर आमिरचा चित्रपट प्रदर्शित होत आहे, या दरम्यान सलमान खानचे २०१४ मध्ये ‘किक’च्या प्रदर्शनानंतर ३ चित्रपट (बजरंगी भाईजान. प्रेम रतन धन पायो व सुल्तान)आले. शाहरुख खानचे २०१४ साली हॅप्पी न्यू ईअरनंतर ३ चित्रपट (दिलवाले, फॅन व रईस) प्रदर्शित झाले. शाहरुख खानचा फॅन हा चित्रपट पूर्णत: फ्लॉप ठरला
.