झारखंडच्या बगोदर येथील शिवमंदिर हरिहरधाममध्ये एका दाम्पत्याने अत्यंत कठीण परिस्थितीत लग्नगाठ बांधली. शोकाकुल वातावरणात लग्नाचे सर्व विधी पार पडले. मुलीच्या आईच्या आकस्मिक निधनानंतर हा विवाह झाला. दु:खाच्या वातावरणात लग्न पार पडल्याने नवरदेवाच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना वधूच्या चेहऱ्यावर. लग्नसोहळ्याला पोहोचलेल्या प्रत्येकाचे चेहरेही कोमेजले होते आणि लोकांना लग्नाचे विधी लवकर पूर्ण करण्याची घाई होती.
मुलीच्या आजारी आईच्या आकस्मिक निधनामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि उत्साह उरला नाही. मुलीची वरात बाहेर काढल्यानंतर, आईची अंत्ययात्रा निघाली. आईचा मृतदेह घरी ठेवून मुलीचा विवाह हरिहरधाम मंदिरात घाईघाईत पार पडला. मुलीची वरात निघाल्यानंतर आईची अंत्ययात्रा बाहेर काढण्यात आली आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण बागोदर ब्लॉकच्या बनपुरा गावाशी संबंधित आहे.
बानपुरा येथील रहिवासी असलेल्या सावित्री देवी बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या, गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांची धाकटी मुलगी काजल कुमारी हिचे लग्न 10 मे रोजी निश्चित झाले होते. आईच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी आईचा मृतदेह घरी ठेवून मुलीचे लग्न लावून देण्याचा मोठा निर्णय घेतला.
काजलचा विवाह मंझलाडीह येथील मोहन दास याच्याशी झाला होता. लग्नानंतर मुलगी पाठवणी झाल्यावर सासरी गेली. यानंतर आईचे पार्थिव बाहेर काढण्यात आले आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान पोहोचलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"