मुंबई - कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी देश एकवटला असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वचजण आपलं योगदान देत आहेत. देशातील बड्या उद्योगपतींनीही कोविडच्या संकटात देशाला मदत केली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्संही मदतीसाठी पुढे आले आहेत. गोरगरिब रुग्णांसाठी अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थानीही पुढाकार घेतला आहे. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डब्बे पुरविण्यातही अनेकजण आपल योगदान देत आहे. या कठिणप्रसंगात लहान मुलेही मागे नाहीत. सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
वर्तमानपत्र, सोशल मीडिया आणि मीडियावरील बातम्यांमधून मन सुन्न होत आहे. रुग्णालयात चाललेली धावपळ, रुग्णवाहिकेचा आवाज, नातेवाईकांचे अश्रू आणि स्मशानातील गर्दी पाहून मनावर आघात होत आहे. मात्र, अशा घटनांमध्येही एखादी सकारात्म बातमी मनावरील मरगळ दूर करते. आपल्या मनावरील ताण हलका करते. या संकटाला तोंड देण्याची ताकद, ऊर्जा देते. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसोबत असलेलं कॅप्शन वाचून, आपण ही लढाई नक्कीच जिंकू असा विश्वास निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.