लोकमत न्यूज नेटवर्कआई आणि नवजात बाळाचा जीव वाचविण्याबाबत देशभरात जागरूकता मोहीम सुरू असूनही भारतात गेल्या २३ वर्षांमध्ये तब्बल १३ लाख गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. गर्भावस्थेमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने आणि प्रसूती होत असताना या महिलांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये माता मृत्यूच्या प्रमाणाची (एमएमआर) राष्ट्रीय सरासरी १०३ वर पोहोचली आहे. याचाच अर्थ प्रति एक लाख गर्भवती महिलांपैकी १०३ महिलांचा जीव गेला आहे.
१२% प्रमाण जगामध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू होण्याचे असून, सरकारी योजनांना तितकेसे यश मिळत नसल्याने गर्भवती महिलांच्या जीवाला धोका वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे.
गर्भवती महिलांच्या मृत्यूवर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायझेसच्या संशोधकांनी जिल्हानिहाय अभ्यास केला...
१९२ जिल्ह्यांत ७० पेक्षा कमी२१० जिल्ह्यांत ७० ते १३० १२४ जिल्ह्यांत १४० ते २०९ ११४ जिल्ह्यांत २१० पेक्षा+
६४० जिल्ह्यांचा देशातील समावेश आहे.
२०१७ ते २०२० दरम्यान या जिल्ह्यांचा अभ्यास करण्यात आला असून, यामध्ये गर्भधारणा झाल्यापासून ते प्रसूतीपर्यंत तसेच गर्भपाताच्या ४२ दिवसांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी देण्यात आली आहे. मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राची स्थिती उत्तम असून, अरुणाचल प्रदेशची स्थिती सर्वांत वाईट आहे.
प्रत्येक दिवशी ८०० महिलांचा मृत्यू गर्भाशी संबंधित समस्यांमुळे जगभरात २००० मध्ये ४.५१ लाख महिलांचा मृत्यू झाला होता. २०१७ मध्ये २.९५ लाख महिलांचा मृत्यू झाला. उत्तम उपचाराची सोय असतानाही आज प्रत्येक दिवशी देशात तब्बल ८०० महिलांचा मृत्यू होत आहे. सर्वांत जास्त मृत्यू हे आफ्रिकेच्या सब-सहारा, दक्षिण आशियाई देशांमध्ये (८६%) होतात.
७० पेक्षा कमीचंडीगड (१५), महाराष्ट्र (४०), पुद्दुचेरी (४१), केरळ (४४), तेलंगणा (५३), तामिळनाडू (५६), आंध्र प्रदेश (६४) २१० पेक्षा अधिकसिक्कीम (२२८), मणिपूर (२८२), मेघालय (२६६), अंदमान निकोबार (२७५), अरुणाचल प्रदेश (२८४)